Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?

खेळाडूंना जर्सी आणि पदक दिलं जात असताना रोहीतने कुलदीपवर एक करडा कटाक्ष टाकल्याचं कॅमेराने टिपलं आहे.

104
Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?
Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकात न्यूझीलंडचा पराभव करत चषक आपल्या नावावर केला आहे. खेळाडू आता मायदेशात परतले आहेत. पण, विजयाचे काही क्षण अजूनही सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यावरून चाहत्यांमध्ये चर्चाही रंगली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) अंतिम सामन्यात ७६ धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर त्याचं नेतृत्वही अख्ख्या स्पर्धेत उठून दिसलं. शिवाय, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये फारसा फॉर्मात नसतानाही त्याने ज्या पद्धतीने कुलदीपची पाठराखण केली त्याचंही कौतुक होतंय.

कारण, कुलदीपला (Kuldeep Yadav) पहिल्या दोन्ही सामन्यांत बळी मिळाले नव्हते. शिवाय तो षटकामागे ४ पेक्षा जास्त गतीने धावा लुटत होता. पण, रोहितने अंतिम सामन्यातही त्याला संधी दिली. अखेर कुलदीपने किफायतशीर गोलंदाजी करतानाच रचिन रवींद्र (Rachin Ravindra) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) हे महत्त्वाचे किवी फलंदाज बाद केले.

(हेही वाचा – Gautam Gambhir : टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकातील गौतम गंभीर समोरची येत्या दोन वर्षांतील आव्हानं)

कुलदीपची (Kuldeep Yadav) मैदानावरील कामगिरी कौतुकास्पद असली तरी बक्षीस वितरणाच्या वेळी त्याला रोहित शर्मचा (Rohit Sharma) काहीसा रोषही ओढवून घ्यावा लागला. रोहितने (Rohit Sharma) त्याच्याकडे टाकलेला कटाक्ष सोशल मीडियावर लोकांच्या नजरेतून सुटलेला नाही.

(हेही वाचा – Road Accident : आता ‘अल्कोहोल’ सोबत ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही होणार; अपघात रोखण्यासाठी सरकार कृतीशील)

खेळाडूंना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्या हस्ते ब्लेझर दिली जात असतानाचा हा प्रसंग आहे. कुलदीपच्या पाठोपाठ रोहितचा (Rohit Sharma) क्रमांक होता. तो मागे उभा होता. पण, कुलदीप (Kuldeep Yadav) त्याचं जॅकेट घालण्यासाठी खूपच वेळ घेत होता. आणि त्याने तो चुकीच्या पद्धतीनेही घातला होता. ते बघून मागे उभा असलेला रोहित (Rohit Sharma) वैतागला असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाने ४ फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी तो निभावलाही. अगदी अंतिम फेरीतही भारताने अक्षर पटेल, रवींद्र जाड़ेजा, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वरुण चक्रवर्ती यांना खेळवलं. आणि स्पर्धेतील ५ सामन्यांत मिळून फिरकीपटूंनी एकूण २१ बळी मिळवले. त्यामुळे भारताची ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. शिवाय अक्षर आणि जाडेजा यांनी संघासाठी अष्टपैलू कामगिरी बजावली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.