दुसरी लता मंगेशकर, Shreya Ghoshal चा जन्मदिन; जाणून घेऊया तिचा जीवन परिचय

27
दुसरी लता मंगेशकर, Shreya Ghoshal चा जन्मदिन; जाणून घेऊया तिचा जीवन परिचय

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिचा जन्म १२ मार्च १९८४ साली पश्चिम बंगाल इथे मुर्शिदाबाद इथल्या बेरहमपूर नावाच्या गावात एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचं बालपण राजस्थानातल्या कोटा जवळ असलेल्या रावतभाटा नावाच्या एका छोट्याशा गावात गेलं. तिच्या वडिलांचं नाव विश्वजीत घोषाल असं आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे काम करतात. तिच्या आईचं नाव शर्मिष्ठा घोषाल असं आहे. त्या साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीधर आहेत.

वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रेयाने (Shreya Ghoshal) संगीत शिकायला सुरुवात केली होती. तिचा एक धाकटा भाऊ सौम्यदीप घोषाल हा एक संगीतकार आहे. श्रेया घोषाल ही एक सुप्रसिद्ध भारतीय गायिका आहे. ती तिच्या विस्तृत गायन श्रेणी आणि बहुमुखी प्रतिभेसाठी प्रसिद्ध आहे. श्रेया घोषाल ही भारतातल्या सर्वांत प्रभावी गायिकांपैकी एक आहे. तिच्या उल्लेखनीय गायन अभिव्यक्तींसाठी तिचे वर्णन ‘द क्वीन ऑफ डायनामाईट्स’ असं केलं जातं. बर्‍याचदा तिची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत केली जाते.

(हेही वाचा – Pakistan Train Hijack : २० सैनिकांची हत्या, १६ दहशतवादी ठार, १०४ ओलिसांची सुटका)

श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) वेगवेगळ्या भारतीय आणि परदेशी भाषांमधल्या चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांमध्ये पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, दोन तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, एक महाराष्ट्र राज्य पुरस्कार, बीएफजेए पुरस्कार, सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि दहा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण यांचा समावेश आहे. पार्श्वगायनाव्यतिरिक्त श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) अनेक टेलिव्हिजन म्युझिक रिॲलिटी शोमध्ये म्हणून दिसते. श्रेयाला युनायटेड स्टेट्स इथल्या ओहायो राज्याने सन्मानित केलं आहे. तिथले गव्हर्नर टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० साली “श्रेया घोषाल दिवस” घोषित केला होता.

एप्रिल २०१३ साली युनायटेड किंगडम्स इथल्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडक सदस्यांनी लंडनमध्ये तिचा गौरव केला होता. तसंच फोर्ब्सच्या भारतातल्या टॉप १०० सेलिब्रिटींच्या यादीत तिला पाच वेळा स्थान मिळालं आहे. एवढंच नाही तर सिनसिनाटी शहराचे महापौर जॉन क्रॅन्ले यांनी २४ जुलै २०१५ साली सिनसिनाटी येथे “श्रेया घोषाल मनोरंजन आणि प्रेरणा दिन” म्हणून घोषित केला त्यावेळी तिच्या नावावर आणखी एक दिवस सन्मानित करण्यात आला. २०१७ साली श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिचा दिल्लीतल्या मादाम तुसाद संग्रहालयाच्या भारतीय विंगमध्ये मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे. जून २०२४ साली किर्क वॉटसन, ऑस्टिन, टेक्सास, युनायटेड स्टेट्सचे महापौर यांनी १५ जून २०१४ हा दिवस “श्रेया घोषाल दिवस” म्हणून घोषित केला, त्यावेळी तिचा तिसऱ्यांदा सन्मान करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.