holi wishes for wife : होळीच्या दिवशी करा तुमच्या बायकोवर सुंदर शुभेच्छांचा वर्षाव!

80
holi wishes for wife : होळीच्या दिवशी करा तुमच्या बायकोवर सुंदर शुभेच्छांचा वर्षाव!

होळी हा सण नात्यांमध्ये प्रेम आणि रंग घेऊन येतो. असं म्हणतात की या दिवशी शत्रू सुद्धा जवळ येतात. सगळा अबोला दूर जाऊन मनाशी मनाचे नाते घट्ट होते. होळीचा सण पती-पत्नीला आणखी जवळ घेऊन येतो. ही जवळीक मनाची असते.

नात्यात काही चढ-उतार आले तरी, होळीच्या निमित्ताने लोक त्यांच्या सर्व तक्रारी विसरून एकमेकांना प्रेमाने रंग लावतात. त्यात नवरा बायकोचं नातं तर अत्यंत खास. मग या होळीला तुमच्या पत्नीला फक्त होळीच्या शुभेच्छा देऊ नका तर या मजेदार संदेशांनी तिचा दिवस खास बनवा. हे होळीचे संदेश वाचा आणि तुमच्या पत्नीला जरुर पाठवा. (holi wishes for wife)

(हेही वाचा – rsmssb : तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणार्‍या RSMSSB ची भूमिका काय आहे?)

१.

निसर्गाच्या सर्व रंगांचा तुझ्यावर वर्षाव होवो,
प्रेमाच्या रंगात आपण दोघेही रंगून जाऊ
चल आपण दोघे मिळून खूप रंग उधळुया,
प्रेमाचा एक नवा इतिहास रचुया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

२.

राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारी,
तू प्रेम तर मी प्रेमाचा पूजारी
चल लावू रंग, नाचू विसरुन भान
मी तुझ्या रंगात रंगलो असा बेभान
होळीच्या शुभेच्छा

३.

या होळीला, आपण दोघे मिळून रंगीत स्वप्ने साकारू, 
होळीच्या पवित्र सणाला आपले नाते मिळून घट्ट करु

४.

होळीच्या या प्रसंगी, आनंदाची पिचकारी उडवतो तुझ्यावर
फक्त एकच हवं तुझ्याकडून, नेहमी विश्वास ठेव माझ्यावर

५.

होळीच्या रंगात धुंद होऊया
इश्काच्या धुंदीत बेधुंद होऊया
पिऊया आपुलकीची थंडाई
तू माझी पुरणपोळी, मजही मिठाई
होळीच्या खूप खूप शुभेच्छा (holi wishes for wife)

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस समारंभात कुलदीपवर का चिडला होता?)

६.

या होळीला, आपले नाते आणखी मजबूत करु
रंग उधळू प्रेमाचे, एकमेकां कधी ना विसरु
माझ्या प्रिय पत्नीला, होळीच्या अनोख्या शुभेच्छा.

७.

आज मी तुझ्यावर प्रेमाचे रंग उधळून लावीन,
आज मी तुला माझ्या प्रेमाच्या वर्षावाने भिजवीन.
होळीच्या शुभेच्छा प्रिय पत्नी!

८.

होळीला मी असा उधळीन रंग
माझी प्रिय पत्नी असेल संग
आम्ही दोघं होऊ पाण्यात चिंब
विसरु दुनियेला, प्रेमात होऊ दंग
हॅप्पी होली डियर वायफी

९.

होळीच्या या सणात, सीमा नसावी आनंदाला.
पुन्हा घेऊ सप्तपदीची वचने, फुलवूया प्रेमाला
तुमच्या प्रिय पत्नीसोबत ही होळी आणखी खास करायची आहे…

१०.

माझ्या प्रिय प्रिय लाडक्या बायकोला,
तुझ्या हास्यापेक्षाही रंगीबेरंगी,
होळीच्या शुभेच्छा. (holi wishes for wife)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.