बाजारात ७० टक्के Paneer भेसळयुक्त; विधानसभेत भाजपाच्या आमदाराचा पर्दाफाश

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे. याबाबत मी एक बैठक लावतो.

90

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात Paneer भेसळ स्वरूपात विक्रीला येत आहेत. हा विषय भाजपाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत मांडला. बाजारात ७० टक्के पनीर भेसळ स्वरूपाचे विक्रीला येत आहे, असा दावा आमदाराने केला. यावेळी त्यांनी बाजारातील भेसळ पनीर आणि नैसर्गिक पनीर अध्यक्षांना दिले आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली.

(हेही वाचा Bangladesh Unrest : शेख हसीनांसह कुटुंबियांची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश)

 मार्केटमधील ७० टक्के Paneer हे बनावट आहे. लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे. हे तेलाचे गोळे आहेत. प्रश्न मांडल्यानंतर धाडी पडल्या. यात १५ लाख किंमतीचे बनावट पनीर पुणे व चंद्रपूरमध्ये सापडले. कायद्यात कठोर कारवाईसाठी तरतूद नाही, ही गंभीर बाब आहे. त्यासाठी खुनाचा प्रयत्नाची तरतूद करावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे. याबाबत मी एक बैठक लावतो. आमदार विक्रमसिंह यांना बोलावले जाईल. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देऊ. बनावट Paneer वर तातडीने कारवाई केली जाईल. वेळ पडल्यास केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना भेटू, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.