लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणात BJP ने विधानसभा निवडणुकीतही यश मिळवले. भाजपाच्या विजयाची ही घौडदौड सुरूच आहे. या ठिकाणी १० महापालिकेपैकी ९ महापालिकेत भाजपाचा महापौर निवडून आला आहे. तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे. मात्र काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय मिळवला आलेला नाही. याशिवाय ३८ नगरपालिकांपैकी बहुतांश नगरपालिकांमध्येही BJP चे उमेदवार विजयी झाले आहेत.
(हेही वाचा बाजारात ७० टक्के Paneer भेसळयुक्त; विधानसभेत भाजपाच्या आमदाराचा पर्दाफाश)
हरियाणामधील १० महानगरपालिका आणि ३८ महानगरपालिकांसाठी २ आणि ३ मार्च रोजी मतदान झाले होते, तर बुधवारी मतमोजणी झाली. यामध्ये हिसार, करनाल, गुरुग्राम, रोहतक, फरिदाबाद, यमुनानगर, पानीपत, अंबाला आणि सोनीपत या महानगरपालिकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर मानेसर महानगरपालिकेमध्ये अपक्ष इंद्रजित यादव हे विजयी झाले आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीतील विजयानंतर राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आल्याची भावना BJP चे कार्यकर्ते व्यक्त करत असून, या निकालांनंतर त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community