एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार का?; भाजपा गटनेते Pravin Darekar यांचा सरकारला सवाल

50
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार का?; भाजपा गटनेते Pravin Darekar यांचा सरकारला सवाल
  • प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना वेळेत आणि ठरलेल्या तारखेला पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का? आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? असा थेट सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

“एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही” – प्रविण दरेकर

विधानपरिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी (PF) विश्वस्त मंडळामध्ये जमा न केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

या चर्चेत भाग घेत आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. सातत्याने पगार रखडतो. मी स्वतः एका एसटी कंडक्टरचा मुलगा आहे. त्यामुळे मला या समस्येची जाणीव आहे.”

(हेही वाचा – Russia चा युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे हल्ला )

“एसटीसाठी यंत्रणा निर्माण करा, कृती आराखडा तयार करा”

दरेकर (Pravin Darekar) यांनी पुढे सांगितले की, “एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात बस असूनही त्यांचा वापर योग्य प्रकारे होत नाही. एसटीच्या जागा आणि संसाधनांचा उपयोग करून उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ठरलेल्या तारखेला वेळेत मिळेल, यासाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा.”

“कर्मचाऱ्यांना वेतनासाठी प्रतीक्षा का करावी?”

“एसटी कर्मचारी अतिशय मेहनती आहेत. ते दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असतात. मात्र, त्यांना स्वतःच्या वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागते, ही परिस्थिती योग्य नाही. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वेतन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकार काय करणार?” असा प्रश्नही दरेकर (Pravin Darekar) यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा – भांडूप पश्चिम परिसरातील कक्कया शेट्टी मार्गावरील ७५ Unauthorized Constructions हटवली; दोन किलोमीटरचा फेरा झाला कमी)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपा गटनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.

“एसटी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे, यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येईल,” असे आश्वासन सरनाईक यांनी सभागृहात दिले.

(हेही वाचा – हरियाणात BJP च्या विजयाची घौडदौड; राज्यात १० पैकी ९ महापालिकेत भाजपाचा महापौर)

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ठोस उपाययोजना होणार?
  • एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, अशी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांची मागणी
  • एसटी महामंडळाच्या जागा आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याची गरज
  • राज्य सरकारने पगार वेळेत मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करावा – दरेकर
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कृती आराखड्याचे आश्वासन दिले

एसटी कर्मचाऱ्यांना आता वेतन मिळण्यास विलंब होणार नाही का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.