CM Medical Assistant Medical Fund : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. दरम्यान याच कक्षाच्या आणि धर्मादाय रुग्णालय मदतीच्या (Charity Hospital Relief Fund) माध्यमातून १० मार्च २०२५ रोजी एकाच दिवशी १७१ रुग्णांना वैद्यकीय मदत (Medical aid) करण्यात आली. या रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक (Rameshwar Naik) यांनी दिली. यामध्ये मेंदूशी निगडीत आजाराचे सर्वाधिक ३५ आणि हिप रिप्लेसमेंटच्या २९ रुग्णांचा समावेश आहे. (CM Medical Assistant Medical Fund)
‘या’ रुग्णांची संख्या जास्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाची व्यापकता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यातूनच १० मार्च रोजी एकाच दिवशी राज्यातील १७१ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून तब्बल १ कोटी ४६ लाख २० हजार रुपये मदत करण्यात आली. मेंदूचा आजार असलेले सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. त्याखालोखल हिप रिप्लेसमेंटचे २९ रुग्ण, हृदयरोगाचे १८ रुग्ण, रस्ते अपघाताचे १७ रुग्ण, कर्करोग शस्त्रक्रियेचे १७ रुग्ण, अपघात शस्त्रक्रियेचे १२ रुग्ण, कर्करोग केमोथेरीपी किंवा रेडीएशनचे १० रुग्ण, बाल रुग्ण १०, नवजात बालरोग ७ रुग्ण, डायलिसिसचे ५ रुग्ण, गुडघा प्रत्यारोपण ५ रूग्ण, कर्करोगाचे २ रुग्ण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण १ रुग्ण, मूत्रपिंड प्रत्यारोपण १ रुग्ण, यकृत प्रत्यारोपण १ रुग्ण, तर विशेष प्रकरणातील १ रूग्ण अशा एकूण १७१ रूग्णांना एकाच दिवशी कक्षाच्या माध्यमातून मदत करण्यात आली.
(हेही वाचा – Holi 2025 : होळी, धुलिवंदन दिवशी ट्रेनवर फुगे, प्लास्टिक पिशव्या मारल्यास होणार कारवाई)
कशी मिळवू शकता मदत
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सहायता कक्षाच्या मदत क्रमांक ८६५०५६७५६७ वर दूरध्वनी करून थेट मोबाइलवर अर्ज उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर मेल करता येतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देता येतील, अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community