
-
मुंबई, (सचिन धानजी)
तोट्यात चाललेला बेस्ट उपक्रम आता दात कोरुन पोट भरावे या उक्तीप्रमाणे कारभार चालवत असून लव्हग्रोव्ह येथील अधिकारी वसाहतीतील सदनिका भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. लव्हग्रोव्ह येथील बेस्ट वसाहतीतील सदनिका या अधिकारी वर्गाला सेवा निवासस्थान म्हणून दिल्या जातात. परंतु याच वसाहतीतील सदनिका या आता सेवा निवासस्थान म्हणून न ठेवता खासगी कंपनीला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC)
वरळी येथील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनच्या बेस्ट अधिकारी निवासस्थानांच्या सदनिकांचे आता भाडेतत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वसाहतीमध्ये वन बेडरुम किचनच्या ८ सदनिका आणि दोन बेडरुम किचनच्या ६ सदनिका असून यासर्वांचे मासिक ११ लाख रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर १ कोटी ३२ लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवली जाणार आहे. यासर्व सदनिका एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. (BMC)
(हेही वाचा – अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा आता मराठीतून; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती)
लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनच्या आवाराज मुंबई मलनि:सारण विल्हेवाट प्रकल्प अंतर्गत महापालिकेच्यावतीने वरळी डब्ल्यूडब्ल्यूटीएफ बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने सुएज अल्टाफॉर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आहे आणि या कंपनीने एसएमसी इन्फ्रास्टक्चर यांची उपकंत्राटदार म्हणून नेमणूक केली आहे. या एसएमसी कंत्राटदार कंपनीला येथील बेस्ट वसाहतीतील सदनिका या आपल्या सेवकवर्गाच्या निवासासाठी योग्य असल्याने त्यांनी या सदनिका भाड्याने देण्याची मागणी केली होती. त्यानुसार या कंपनीच्या सेवकवर्गासाठी निवासाकरता या जागा भाडेतत्वावर देण्यात येत आहे. (BMC)
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील बेस्ट अधिकारी वर्गाच्या निवासासाठी ही तळ मजला अधिक पाच मजल्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये वन बीएचकेच्या १२ सदनिका आणि टू बीएचकेच्या सहा सदनिका आहेत. यातील मागील काही वर्षांपासून विविध करणासाठी वन बीएचकेच्या सदनिका क्रमांक ५ आणि सदनिका क्रमांक १४ वगळता उर्वरीत सदनिका रिक्त आहेत, या रिक्त सदनिका भाड्याने देण्यात आल्या आहेत. या रिक्त सदनिकांच्या भाडेपोटी आगावू स्वरुपात ११ लाख ०६ हजार रुपये एवढी रक्कम बेस्ट उपक्रमाला प्राप्त होणार आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community