-
सुजित महामुलकर
मुलांच्या शासकीय दस्तऐवजांमध्ये वडिलांच्या नावांसोबत आधी आईचे नावे आणि मग आडनाव लावण्यात यावे, या राज्य शासनाने वर्षभरापूर्वी घेतलेल्या निर्णयावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या एका महिला आमदाराने नवा पेच समोर आणला. (Legislative Assembly)
दोन पर्याय ठेवावे
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या, आमदार सना मलिक यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करून महिलांनी आईचे नाव आणि पतीचे नाव कसे लावावे? असा प्रश्न केला. तसेच सना मलिक यांनी विवाहित महिलांना दोन पर्याय देण्याची विनंती शासनाला केली. त्या म्हणाल्या की, त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रावर स्वतःच्या नावासोबत आई आणि वडिलांचे नाव आले. मात्र, विधानसभेला निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावात आईच्या आणि नवऱ्याच्या नावाचा उल्लेख करण्याची सूचना केली. त्यामुळे महिलांना विवाहापूर्वीचे आणि विवाहानंतरचे नाव लिहिण्याचा, असे दोन पर्याय ठेवावे. “मला माझ्या माहेरचे आणि सासरचे, अशी दोन्ही आडनावे लिहायची इच्छा आहे. त्यामुळे शासनाने एक निर्णय घेतला तर योग्य होईल,” असे सना म्हणाल्या. (Legislative Assembly)
(हेही वाचा – एसटीच्या भाडेतत्त्वावरील बसमध्ये १७०० कोटींचा घोटाळा, महिनाभरात कारवाई; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही)
शासनाने उचित निर्णय घ्यावा
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नाची दखल घेत, हा प्रश्न महत्वाचा आहे, असे सांगितले आणि शासनाने यासंदर्भात उचित निर्णय घेऊन शासन निर्णय जारी करावा, असे निर्देश शासनाला दिले. नार्वेकर पुढे म्हणाले की, विवाहित महिलेला तिच्या आईचे आणि नवऱ्याचे नावे लिहिणे अवघड होते. त्यामुळे त्यांचे लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे आडनाव लावण्याची मुभा द्यावी, अशी सूचना केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी होकारार्थी उत्तर दिले. (Legislative Assembly)
बंधनकारक केवळ २०२४ नंतरच्या मुलांना
दरम्यान, १४ मार्च २०२४ म्हणजेच एक वर्षांपूर्वी महिला व बाल कल्याण विभागाचा शासन निर्णय जारी झाला त्यात स्पष्टपणे याबाबत स्पष्टपणे म्हटले आहे की आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या मुलांना लागू असेल. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत राध्या अस्तित्वात असलेल्या पध्दतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया शुरू ठेवण्यात यावी. तसेच जीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यात येत आहे. (Legislative Assembly)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community