वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार; आमदार Rajendra Gavit यांची माहिती

54
वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार; आमदार Rajendra Gavit यांची माहिती
वसई विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापनाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी होणार; आमदार Rajendra Gavit यांची माहिती

वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar City Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापनाचा घोटाळा आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) विधानसभेत लक्षवेधी च्या माध्यमातून उघडकीस आणला असून मंत्री महोदयांनी उच्च समितीद्वारे चौकशी केली जाईल असे आश्वासित केले आहे.

( हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप विकसित करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती)

यावेळी आमदार गावित (Rajendra Gavit) म्हणाले की, वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये (Vasai Virar City Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन संबंधित २४ कोटी ६४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची माहिती आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली यात भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे लेखापाल (ऑडिट-१) महाराष्ट्र यांच्याकडील परीक्षण अहवालात उक्त प्रकल्पाचा कोणताही उपयोग न होता २४ कोटी ६४ लाख खर्च केला गेला असल्याचे उघडकीस आले आहे, उक्त प्रकल्प फसल्यामुळे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (Maharashtra Pollution Control Board) यांच्याद्वारे वसई विरार शहर महानगरपालिकेला (Vasai Virar City Municipal Corporation) नोटीस बजावलेली असून प्रति महिना 20 लाख रुपये दंड ठोकावला आहे.

तसेच या प्रकल्पाचे मुंबई आयआयटी (IIT Bombay), पवई यांच्या माध्यमातून त्रिसदस्य संस्था परीक्षण झाले असून त्याचा अहवाल ऑडिट रिपोर्ट माहे मे, 2017 मध्ये सादर करण्यात आलेला होता, या तीनही अहवालाच्या नुसार शासनाने कार्यवाही करावी आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी जोरदार मागणी केली असता मंत्री महोदयांनी लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.