“पुढची मुंबई पालघरमध्ये…” ; CM Devendra Fadnavis यांचं विधान

"पुढची मुंबई पालघरमध्ये..." ; CM Devendra Fadnavis यांचं विधान

75
"पुढची मुंबई पालघरमध्ये..." ; CM Devendra Fadnavis यांचं विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात विकेंद्रीकरण करण्याबाबत भाष्य केले. याचबरोबर त्यांनी पुढची मुंबई (Mumbai ) पालघरमध्ये (Palghar) होणार असल्याचेही म्हटले आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-राज्यात लवकरच सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री Chandrakant Patil यांची माहिती 

राज्यातील आर्थिक विकेंद्रीकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यातील आर्थिक विकासाचे विकेंद्रीकरण किंवा आर्थिक विकास इतर केंद्रांवर पोहचवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भौतिक विकास कसा करता येईल आणि तो सर्व भागांमध्ये कसा पोहचवता येईल, मग समृद्धीसारखा महामार्ग असेल किंवा आता आपण शक्तीपीठ महामार्ग करतोय, यामुळे जे जिल्हे आतापर्यंत मागास म्हणून ओळखले जायचे ते आता मध्यभागी आले आहेत.” (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा-BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ

“आता वाढवण बंदरामुळे पुढची मुंबई पालघरमध्ये होणार आहे. जिथे देशातील सर्वात मोठे बंदर त्याचठिकाणी, विमानतळ त्याचठिकाणी आणि बुलेट ट्रेनचे स्टेशनही त्याचठिकाणी असणार आहे. त्यामुळे तिथे एक ट्रिनीटी तयार होत आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळात चौथी मुंबई वाढवणला पाहयला मिळेल. तिसरी मुंबई आपण नवी मुंबई विमानतळाजवळ तयारच करत आहोत.” (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.