holi special food : सण म्हणजे खमंग जेवणाचा आनंद; होळीला महाराष्ट्रात केले जातात हे पदार्थ!

123
holi special food : सण म्हणजे खमंग जेवणाचा आनंद; होळीला महाराष्ट्रात केले जातात हे पदार्थ!

महाराष्ट्रात वेगवेगळ्या सणांच्या प्रसंगी एक परिपूर्ण महाराष्ट्रीयन थाळी प्रत्येक घरात पाहायला मिळते. त्याप्रमाणेच होळीच्या सणालाही खास पदार्थ असलेली थाळी तयार केली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या कोरड्या भाज्या, रायतं, सॅलड्स, भाताचे प्रकार, लोणचे, चटण्या आणि त्या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे पुरणपोळी! अशी परिपूर्ण असलेली थाळी आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. (holi special food)

(हेही वाचा – ‘रोजा’ सोडण्यासाठी विधानभवनासमोरच्या पदपथाचा वापर; मंत्री Nitesh Rane यांच्या निर्देशानंतर कारवाईला वेग)

होळीच्या दिवशी तयार करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रीय पद्धतीच्या थाळीमधल्या पदार्थांचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे :

पुरणपोळी : ही चणा डाळीपासून तयार केलेल्या पुरणाची गोड पोळी असते. पुरणपोळी हा महाराष्ट्रातला एक परिपूर्ण असलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. पुरणपोळी फक्त होळीपूरतीच मर्यादित नसून इतर अनेक उत्सवांच्या वेळीही तयार केली जाते.

नारळाची चटणी : ताजे खोबरे, मिरच्या, धणे, कैरी किंवा एखाद्या लिंबाचा रस, मीठ आणि थोडीशी साखर यांचं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून चटणी तयार केली जाते.

लोणचे : तोंडी लावायला लोणचे नसेल तर तुमची थाळी पूर्ण होत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाचंही, घरचं किंवा बाहेरून आणलेलं लोणचं वापरू शकता.

काकडीची कोशिंबीर : यामध्ये बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर, दही, मीठ, साखर आणि थोडीशी शेंगदाण्याचं कूट घातलं जातं. त्यानंतर त्यां जिरे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे मिश्रण थोडं तुपात तळून कोशिंबिरीवर फोडणी घातली जाते जेणेकरून अधिक चव यावी. (holi special food)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान आठ महत्त्वाचे करार)

गाजराची कोशिंबीर : काकडीच्या कोशिंबिरी प्रमाणेच ही तयार केली जाते. आंबटपणासाठी यामध्ये दही किंवा थोडासा लिंबाचा रस घातला जातो.

बटाट्याची भाजी : उकडलेल्या बटाट्याच्या चौकोनी केलेल्या फोडींना कढीपत्ता, मिरच्या आणि उडीद डाळ वापरून मसालेदार फोडणी देतात. त्यावर ताजे किसलेलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर शिंपडली जाते.

फरसबीची भाजी : बारीक कापलेली फरसबी फोडणीवर परतली जाते. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून दाणे मऊ होईपर्यंत ही भाजी शिजवली जाते. चवीसाठी यात शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, लिंबाचा रस, किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालतात. (holi special food)

(हेही वाचा – Holi Festival 2025 : उत्तर प्रदेशमध्ये होळीच्या दिवशी महिला पुरुषांना मारतात फटके; वाचा होळीचे विविध उत्सव)

कटाची आमटी : जेव्हा चणा डाळ पुरणपोळीसाठी शिजवली जाते, तेव्हा डाळ शिजवलेलं जास्तीचं काढून न टाकता त्याची ‘आमटी’ तयार केली जाते.

मसालेभात : मसाले भात तयार करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केला जातो. हा पुलावाचाच एक प्रकार आहे.

पंचामृत : ही एक तिखट चिंचेची चटणी असते. त्यामध्ये वाळलेले नारळाचे काप, तीळाची पावडर, शेंगदाण्याचं कूट, मिरच्या आणि गूळ किंवा साखर वापरली जाते

सामान्यतः अशा प्रकारची महाराष्ट्रीयन थाळी होळीच्या दिवशी घरोघरी बनवली जाते. (holi special food)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.