-
प्रतिनिधी
शिवसेना (Shiv Sena) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळला असून शिवसेनेने शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी, मातोश्री बाहेर बॅनरबाजी करत होळी साजरी करत राजकीय शक्तिप्रदर्शन केले. ‘हिंदुत्वाचा एकच रंग’ असा संदेश देणाऱ्या बॅनरसोबत शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंवर कुरघोडी केली आहे.
शिवसेनेने (Shiv Sena) ‘उत्सवाची रंगत, होळीच्या संगत’ असा मजकूर असलेल्या फलकांसह हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेतून बंड करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना उबाठा आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे.
(हेही वाचा – औरंगजेबाची कबर नष्ट करावी; MP Naresh Mhaske यांची लोकसभेत मागणी)
मातोश्रीबाहेर झालेल्या या बॅनरबाजीच्या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसेना उबाठा कडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिवसेनेने (Shiv Sena) अशा प्रकारच्या हालचाली करून शिवसेना उबाठाला आव्हान दिले होते.
राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून हिंदुत्वाच्या मुद्यावरून दोन्ही गटांमध्ये अधिक संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेना उबाठा कडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community