महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमी दिवशी हा सण साजरा केला जातो. माहेरवाशीण महिलांसाठी, मुलींसाठी हा दिवस खास असतो. या निमित्ताने मैत्रिणींसोबत खेळ खेळण्याची, सण साजरा करण्याची संधी त्यांना मिळते. आता सण म्हटलं की, गोडा-धोडाचे पदार्थ आलेच. नागपंचमीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर, गोव्यामध्ये हळदीच्या पानातल्या पातोळ्या करण्याची पद्धत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांत पुरणाचे दिंड केले जातात. मग यंदा तुम्ही देखील घरच्या घरी नागपूजा करुन नागपंचमीचा सण साजरा करणार असाल, तर पहा नैवेद्याला हमखास बनवले जाणारे पारंपारिक पदार्थ पातोळ्या आणि पुरणाचे दिंड झटपट घरच्या घरी कसे बनवले जातात.
साहित्य-
१ वाटी तांदळाचे पीठ
१ वाटी पाणी
१ चमचा तूप
१ वाटी किसलेले खोबरे
अर्धा वाटी किसलेले गुळ
अर्धा चमचा वेलची पूड
८ ते १० हळदीची पाने
पातोळ्या, पुरणाचे दिंड कृती
१. प्रथम ओले खोबरे, गूळ, वेलची एकत्र शिजवून सारण करुन घ्या.
२. एक वाटी पाणी उकळून त्यात तूप आणि मीठ टाका व नंतर तांदळाचे पीठ टाकून एक उकड काढून घ्या.
३.थोडेसे थंड झाल्यावर पीठ व्यवस्थित मळून घ्या.
४. पिठाचीे पेढ्या एवढी गोळी घ्या आणि हळदीच्या पानाला पाण्याचा हलकासा हात लावून, त्यात दोन्ही बाजूला पसरा.
५. पानाच्या एका बाजूला सारण पसरा आणि पान दुमडून ठेवा.
६. सर्व पाने तयार झाल्यावर मोदक उकडतात त्याप्रमाणे उकडून घ्या.
अशा पद्धतीने चविष्ट अशा पातोळ्या तयार करुन नागपंचमीचा सण आनंदाने साजरा करा.
Join Our WhatsApp Community