Pakistan मध्ये ट्रेन अपहरणानंतर आता लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला

दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यातील फ्रेटियर कॉर्प्सच्या शिबिराजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ८ ते ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

82

पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणानंतर आता खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बरेच लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. आत्मघातकी हल्लेखोराने पाकिस्तानी सैन्याच्या तळावर जात स्वत:ला उडवून घेतले आहे. खैबर पख्तूनख्वाच्या टँक जिल्ह्यातील जंडोला मिलिट्री कॅम्पवर हा हल्ला झाला. या हल्ल्यामागे अफगाणिस्तान पाकिस्तान (Pakistan) सीमेवर सक्रीय दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा भगवान श्रीकृष्णाचा पोशाख आणि दागिने मुस्लिमांकडून खरेदी करू नये; Dinesh Falahaari यांचे वृंदावनातील मंदिराला निवेदन)

पाकिस्तानी (Pakistan) आऊटलेट जियो न्यूजनुसार, दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यातील फ्रेटियर कॉर्प्सच्या शिबिराजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ८ ते ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जंडोला इथे एक जोरदार स्फोटाचा आवाज ऐकायला आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. दहशतवाद्यांनी जंडोला चेकपोस्टवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना रोखले. मात्र एका आत्मघातकी हल्लेखोराने कॅम्पजवळ वाहन घुसवून स्फोट घडवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला सांगितले. ११ मार्च रोजी बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी बोलन घाटात क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला करून ती हायजॅक केली. या ट्रेनमध्ये २०० सुरक्षा जवान आणि ४५० हून अधिक प्रवासी होते. पाकिस्तानी (Pakistan) सैन्याने अथक प्रयत्नानंतर २०० प्रवाशांना सोडण्यात आले. ५० बंडखोरांना ठार केले. मात्र १५० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आमच्या ताब्यातच आहेत असा दावा बीएलएने केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.