BMC : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला महापालिकेच्या कामांचा आढावा

50
BMC : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला महापालिकेच्या कामांचा आढावा
BMC : राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला महापालिकेच्या कामांचा आढावा
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन (M. Venkatesan) यांनी स्वच्छता कामगारांच्या विविध मागण्या आणि त्यांचे निराकरण करण्यासंदर्भात मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी १३ मार्च २०२५ रोजी बैठक घेतली. कामगारांच्या मागण्या आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग कटिबद्ध असल्याची भावना अध्यक्ष व्यंकटेशन (M. Venkatesan) यांनी व्यक्त केली.

WhatsApp Image 2025 03 13 at 8.09.38 PM

राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन (M. Venkatesan) यांच्यासह आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा, मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे आणि संबंधित अधिकारी आदींची या बैठकीस उपस्थिती होती.

(हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले रोडचे पूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार खुले)

मुंबई महानगरपालिकेतील (BMC) स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, निवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी स्वच्छता कामगारांच्या विविध मागण्या आणि प्रश्न मांडले. कामगारांच्या मागण्या आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग कटिबद्ध असल्याची भावना अध्यक्ष व्यंकटेशन (M. Venkatesan) यांनी व्यक्त केली.

कामगार हे मुंबई महानगरपालिकेचे (BMC) महत्वपूर्ण घटक असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) आणि उप आयुक्त दिघावकर यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:स्सारण विभागातील दैनंदिन कामकाज, विविध प्रकल्प याविषयी उप आयुक्त दिघावकर यांनी माहिती दिली. तसेच स्वच्छता कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचीही माहिती आयोगापुढे सादर करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.