शासन निर्णय क्रमांक किसनि-२०२३/प्र.क्र./४२/११ दिनांक १५ जून २०२३ अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) अंतर्गत शेतकऱ्यांच्या (Farmer) मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असले रक्कम गायब होत आहे.
(हेही वाचा – CM Relief Fund : सीमा भागातील नागरिकांना आरोग्य मदत सुलभ करण्याचा प्रयत्न )
शेतकऱ्यांनी मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडू नये किंवा सदर लिंक चा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळचा संबंधित सायबर पोलिसांकडे (Cyber police) तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड, वंदना शिंदे (Vandana Shinde) यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community