हिंदूंनी (Hindu) हलाल सर्टिफिकेशनचे (Halal Certification) खाद्यपदार्थ का खावे? हिंदू (Hindu) ग्राहकांनी बाजारातील हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालावे. हलाल सर्टिफिकेशन असलेल्या खाद्यपदार्थात काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज असून हलाल सर्टिफिकेशनसाठी (Halal certification) कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशाचं पुढे काय होते ? त्याचा वापर कुठे होतो? या गौडबंगालाचा शोध सरकारने घ्यावा अशी मागणी भाजपा (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. त्यातच हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह आहेत.
( हेही वाचा : Mhada Transit Camp : दुसऱ्या सुनावणीस केवळ दोनच अर्जदारांची उपस्थिती, पुन्हा तिसऱ्यांदा दिली सुनावणीची संधी)
खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले की, हलाल सर्टिफिकेशन हे मोठं गौडबंगाल आहे. हलाल सर्टिफिकेशन (Halal certification) करणारी खाजगी बॉडी असून ते हलाल सर्टिफिकेशनसाठी (Halal certification) पैसे गोळा करतात. नंतर हे गोळा केलेले पैसे जातात कुठे? तसेच हे पैसे कशासाठी वापरले जातात, हे कोणाला माहित नाही. आम्ही हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशनचे खाद्यपदार्थ का खावे? आम्ही एफएसएसआय (FSSAI), एगमार्क, आयएसआय मार्क (ISI mark) असलेले खाद्यपदार्थ खाऊ. आमचा विश्वास सरकारच्या सर्टिफिकेशनवर राहील, असेही बोंडे (Anil Bonde) यांनी म्हटले आहे.
तसेच बोंडे (Anil Bonde) यांनी हिंदू (Hindu) ग्राहकांना बाजारातून वस्तू खरेदी करताना सरकारमान्य एगमार्क एफएसएसआय आणि आयएसआय मार्क असलेल्या वस्तू खरेदी कराव्या. हलाल सर्टिफिकेशनच्या मागे लागू नये. उलट हलाल सर्टिफिकेशन (Halal certification) असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा. त्यामुळे हिंदूंकडून (Hindu) या कंपन्यांकडे जाणारा पैसा थांबवता येईल आणि त्याचा गैरवापर थांबवता येईल, असेही बोंडे (Anil Bonde) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community