मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष Muhammad Zia-ul-Haq यांचा ‘छावा’ चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध

75
मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष Muhammad Zia-ul-Haq यांचा 'छावा' चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध
मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष Muhammad Zia-ul-Haq यांचा 'छावा' चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध

विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत आणि लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शत ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला. औरंगजेबाच्या क्रूरपणाची संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला ओळख झाली. त्यामुळेच हा चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला. मात्र त्याचवेळी धर्मांधांनी तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध केला. ज्यामुळे धर्मांधांकडून बंदीची मागणी होऊ लागली.

( हेही वाचा : Structural Audit :  दुतोंड्या मारुतीसह दहा वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट)

आंध्र प्रदेशमधील मुस्लिम फेडरेशनने (Muslim Federation) नेल्लोर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. या संघटनेने चित्रपटाच्या आशयाबाबत प्रश्नचिव्ह उपस्थित केले आहे. त्यासंदर्भात आंध्र प्रदेशातील मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष मोहम्मद झियाउल हक (Muhammad Zia-ul-Haq) यांनी नेल्लोर जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिकपणे याचिका दाखल केली आहे आणि तेलगू राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

दरम्यान, ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाला अशा विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. चित्रपटाच्या हिंदी प्रदर्शनावेळीही अशाच प्रकारची टीका झाली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकडेवारीनुसार, चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा ओलांडला आहे. तरीही औरंग्याचा क्रूरपणा लपवण्यासाठी छावाच्या प्रदर्शनाला विरोध केला जात आहे. (Muhammad Zia-ul-Haq)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.