Kargil आणि अरुणाचलला भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ‘एक्स’वर दिली माहिती

34
Kargil आणि अरुणाचलला भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने 'एक्स'वर दिली माहिती
Kargil आणि अरुणाचलला भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने 'एक्स'वर दिली माहिती

आज देशात सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात आहे. त्यातच भूगर्भीय क्रियाकलापांमुळे, पृथ्वी ४ तासांत दोनदा हादरली. त्यामध्ये कारगिल (Kargil) आणि अरुणाचलमध्ये (Arunachal Pradesh) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (National Center for Seismology) ‘एक्स’ हँडलवर ट्विट करत दिली आहे.

( हेही वाचा : PM Kisan APK लिंक उघडताच शेतकऱ्यांची बँक खाते होताहेत रिकामी

दरम्यान पहिला भूकंप उत्तर भारतात झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू लडाख (Ladakh) या केंद्रशासित प्रदेशातील कारगिल (Kargil) परिसर होता. रात्री उशिरा २.५० वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिल (Kargil) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त १५ किमी खोलीवर होते. भूकंप रात्री उशिरा झाला, त्यामुळे बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नव्हती. पण काही लोकांना भूकंपाची माहिती मिळताच, ते लगेच घराबाहेर पळून गेले. कारगिल (Kargil) परिसरात रात्रीचे तापमान खूपच कमी असल्याने, येथे अजूनही थंडी सुरूच आहे. त्यातच दि. १४ मार्च रोजी सकाळी ६.०१ वाजता अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) पश्चिम कामेंग येथे दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. येथे भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त १० किमी खोलीवर होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.