IPL 2025 : आयपीएलमधून माघार घेणाऱ्या हॅरी ब्रूकवर दोन वर्ष बीसीसीआयने केली निलंबनाची कारवाई

IPL 2025 : बीसीसीआयने परदेशी खेळाडूंच्या माघारीवर कडक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे.

43
IPL 2025 : आयपीएलमधून माघार घेणाऱ्या हॅरी ब्रूकवर दोन वर्ष बीसीसीआयने केली निलंबनाची कारवाई
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंडचा अव्वल खेळाडू हॅरी ब्रूकवर अखेर बीसीसीआयने दोन वर्षांची आयपीएल बंदी लादली आहे. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ब्रूकने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंदीची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने २०२५ आणि २०२६ च्या हंगामांसाठी ब्रूकवर बंदी घालण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. मागच्या दोन हंगामात परदेशी खेळाडूंनी लीग अर्धवट सोडून जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्याचा फटका फ्रँचाईजींना बसतो. फ्रँचाईजींनी खेळाडूंवर कोट्यवधी पैसे खर्च केलेले असतात, ते ही फुकट जातात आणि खेळाडू ऐनवेळी अनुपलब्ध होतो. गेल्या हंगामात बंगळुरू रॉटल चॅलेंजर्सला ग्रेन मॅक्सवेलने असाच त्रास दिला होता.

त्यामुळे बीसीसीआयने खासकरून परदेशी खेळाडूंच्या बाबतीत कडक धोरण आखताना लिलावात सहभागी होऊनही हंगामात न खेळणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. फ्रँचाईजींनी तशी तक्रारच बीसीसीआयकडे केली होती. पण, अशी पहिली कारवाई हॅरी ब्रूकवर होत आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Manish Sisodia आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या; १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी)

विशेष म्हणजे ब्रूकने सलग दुसऱ्यांदा आयपीएलमधून माघारीचा निर्णय घेतला आहे. ब्रूकने दोनच दिवसांपूर्वी आपली फ्रँचाईजी दिल्ली कॅपिटल्स आणि चाहत्यांची क्षमा मागितली होती. ‘काही राखून न ठेवता,’ मी तुमची माफी मागतो, असं म्हणत ब्रूकने इंग्लिश संघासाठी खेळणं हीच आपली प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं होतं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत इंग्लिश संघ साखळीतच गारद झाला. त्यानंतर जोस बटलरने नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे आणि बेन स्टोक्सच्या बरोबरीने सध्या हॅरी ब्रूकचीही भावी कर्णधार म्हणून चर्चा सुरू आहे.

‘यंदा आयपीएलमधून माघारीचा अत्यंत कठीण निर्णय मी घेतला आहे. त्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चाहत्यांची मी जाहीर माफी मागतो. पण, इंग्लिश क्रिकेट संघ सध्या स्थित्यंतरातून जात आहे आणि अशावेळी संघासाठी कायम उपलब्ध राहण्यालाच माझी प्राथमिकता असेल. मी राष्ट्रीय संघासाठी माझी असलेली कटीबद्धता सोडू शकत नाही,’ अस ब्रूकने सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे. ‘राष्ट्रीय संघावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मला व्यस्त कार्यक्रमातून सुट्टी घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे आयपीएल खेळण्याऐवजी तो वेळ मी आगामी मालिकांची तयारी करण्यासाठी वापरणार आहे. मी काय म्हणतोय, हे कदाचित सगळ्यांना समजणार नाही. पण, मला जे योग्य वाटतं, तेच मी करत आहे,’ असं पुढे ब्रूक आपल्या संदेशात म्हणतो. (IPL 2025)

(हेही वाचा – Kargil आणि अरुणाचलला भूकंपाचे धक्के; राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ‘एक्स’वर दिली माहिती)

जून महिन्यात इंग्लिश संघ घरच्या मैदानावर भारतीय संघाशी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने येणार आहे. जूनमध्ये नवीन कसोटी अजिंक्यपद चक्र सुरू होत आहे आणि त्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. तर त्यानंतर सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात इंग्लिश संघ अशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. याआधी २०२४ मध्ये आजी वारल्यामुळे कुटुंबाबरोबर राहण्यासाठी हॅरी ब्रूक आयपीएल खेळला नव्हता. आता या कारवाईमुळे त्याला थेट २०२७ च्या आयपीएलमध्येच खेळता येईल आणि ते ही त्याला लिलावाच्या प्रक्रियेतून पार व्हावं लागेल. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.