
गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडू (Tamil Nadu) सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहे. त्यातच तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॉलिन (M K Stalin) यांनी अर्थसंकल्पामध्ये (Budget) रुपया चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई (तमिळमध्ये रुपये) मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या या निर्णयावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी टीका केली आहे.
( हेही वाचा : मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष Muhammad Zia-ul-Haq यांचा ‘छावा’ चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, सर्व निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून ‘₹’ सारखे राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्यांनी पदभार स्वीकारताना घेतलेल्या शपथेच्या विरुद्ध आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होत आहे. ही मानसिकता देशासाठी धोकादायक आहे. हे भाषा आणि प्रादेशिक अराजकतेचे उदाहरण आहे, अशी टीका निर्मला सीतारमण यांनी स्टॉलिन यांच्यावर केली. (Tamil Nadu)
राज्याच्या अर्थसंकल्पाचा टीझर एमके स्टॅलिन (M K Stalin) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला होता. त्यात त्यांनी तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपया चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील (Tamil language) रुबई (तमिळमध्ये रुपये) मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. तसेच “समाजातील सर्व घटकांच्या लाभाकरिता तामिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी…”, हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलण्यात आले. मात्र राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास एखाद्या राज्याने नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे स्टॉलिन (M K Stalin) यांना वादाला समोरे जावे लागत आहे. (Tamil Nadu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community