जर तुम्ही भंडारदरा इथे सहलीला जाण्याचं नियोजन करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भंडारदरा इथलं हवामान कसं आहे? आणि इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता? याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग, पाहुयात…
भंडारदरा हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे ७४० मीटर उंचीवर वसलेलं आहे. विकेंडची सुट्टी घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. भंडारदरा हे महाराष्ट्रातल्या हिरव्यागार पश्चिम घाटाच्या परिसरात स्वच्छ तलाव आणि उंच डोंगरांनी नटलेलं हिल स्टेशन आहे. भंडारदरा हे सहलीला जाण्यासाठी एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. इथे भेट देण्यासाठी वर्षभरातला सर्वोत्तम काळ कोणता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
भंडारदरा येथे तुम्ही वर्षभरात केव्हाही भेट देऊ शकता. इथला निसर्ग एक्सप्लोर करू शकता, इथल्या जलमार्गांना भेट देऊ शकता. तसंच ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि रोमांचक ऍडव्हेंचरचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. पण तरीही भंडारदरा येथे आनंद घेण्यासाठी सर्वात आदर्श हवामान म्हणजे हिवाळा होय. (bhandardara camping)
(हेही वाचा – Manish Sisodia आणि सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढल्या; १३०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी FIR दाखल करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी)
वर्षाच्या तीनही ऋतूंमध्ये भंडारदरा इथलं वातावरण कसं असतं ते पाहुयात :
उन्हाळा
भंडारदरा हे एक हिल स्टेशन असलं तरी उन्हाळ्यात इथलं वातावरण खूपच उष्ण असतं. इथलं सरासरी तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस एवढं असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान दिवसा उष्ण आणि दमट असतं, तर रात्री खूप थंडी पडू शकते. मैदानी प्रदेशातल्या आर्द्रतेपासून दूर राहण्यासाठी पर्यटक उन्हाळ्यामध्ये भंडारदरा येथे येतात. उन्हाळ्यात तुम्ही छोट्या ट्रेकसाठी जाऊ शकता आणि इथल्या तलावांजवळ कॅम्पिंगही करू शकता.
मे महिन्यात इथे अधूनमधून पाऊस पडू शकतो त्यामुळे इथलं तापमान कमी होण्यास मदत होते. पण उन्हाळा हा मुख्यतः पर्यटनाचा हंगाम मानला जात नाही. तरीही जर तुम्ही उन्हाळ्यात भंडारदरा येथे भेट दिली तर भरपूर बाटलीबंद पाणी स्वतःजवळ ठेवा. (bhandardara camping)
(हेही वाचा – मुस्लिम फेडरेशनचे अध्यक्ष Muhammad Zia-ul-Haq यांचा ‘छावा’ चित्रपटाच्या तेलगू भाषेतील प्रदर्शनाला विरोध)
पावसाळा
भंडारदरा येथे पावसाळ्यात वातावरण खूप आल्हाददायक असतं. पावसाळ्यामध्ये रंधा धबधबा, लेक आर्थर आणि विल्सन डॅमसारखे ओढे आणि तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले असतात. पावसाळ्यात इथलं वातावरण दमट, ताजं आणि हिरवंगार असतं. भंडारदरा हिलस्टेशनवर राहण्यासाठी हा एक सुंदर काळ मानला जातो.
पण इथे पाऊस कधीकधी मध्यम ते मुसळधार असतो. त्यामुळे इथे प्रवास करणं, पर्यटन स्थळं पाहणं आणि खासकरून डोंगरावर ट्रेकिंग करणं हे त्रासदायक ठरू शकतं. पण इथे येणारे पर्यटक भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू मानतात. (bhandardara camping)
(हेही वाचा – हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा; भाजपा खासदार Anil Bonde यांचे आवाहन)
हिवाळा
भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. कारण या काळात आकाश अगदी स्वच्छ असतं. तरीही दिवसा वातावरण थंडगार असतं. भंडारदरा इथे शहरांतल्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ नक्कीच आराम मिळतो. हिवाळा हा ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि तलावांजवळ बराच वेळ घालवण्यासाठी किंवा बोटीतून प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम ऋतू आहे.
याव्यतिरिक्त तुम्ही धबधब्यांना भेट देऊ शकता. हिवाळ्यामध्ये स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी ग्रामीण भागाठी फिरू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही कळसुबाई शिखर किंवा इतर लहान डोंगरांवर वर ट्रेक करू शकता. तसंच कॅम्प फायरभोवती बसून आभाळातल्या चांदण्या पाहू शकता. इथलं निरभ्र आकाश, थंड हवामान आणि त्यासोबतच उंच पर्वत उतारांची काही विहंगम दृश्ये तुमच्या मनात भरून राहतात. ट्रेकर्स भंडारदऱ्याला भेट देण्यासाठी तसंच ट्रेकिंगसाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानतात. (bhandardara camping)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community