-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक जोमाने प्रयत्न करत आहे. एकीकडे रुपया डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांच्याही वर पोहोचला असताना भारताच्या परकीय गंगाजळीत ७ मार्चला संपलेल्या आठवड्यात विक्रमी वाढ झाली आहे. २०२१ नंतर एका आठवड्यात झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आहे आणि या आठवड्यात परकीय गंगाजळी १५.३ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढून ६५४ अब्जांवर पोहोचली आहे. मध्यवर्ती बँकेनं इतर चलनांमधील साठा विकून अमेरिकन डॉलर विकत घेतल्यामुळे हा परिणाम जाणवत आहे. (Forex Reserve)
(हेही वाचा – पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध; Prakash Abitkar यांचे प्रतिपादन)
२८ फेब्रुवारीलाच रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं होतं. परकीय चलनातील या व्यवहारांना चलनातील स्वॉपिंग म्हणतात. म्हणजे एक चलन देऊन दुसरं चलन खरेदी करणं. फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवसांत रिझर्व्ह बँकेनं इतर देशांतील चलन खर्च करून १० अब्ज अमेरिकन डॉलर खरेदी केले. त्यामुळे ही वाढ परकीय गंगाजळीत झाली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेनं चलन बाजाराती काही वायद्याचे सौदेही केले आहेत. म्हणजे सध्या आपल्याकडील रुपये खर्चून वायदे बाजारात अमेरिकन डॉलर विकत घेतले आहेत. भविष्यातील निर्धारित तारखेला मध्यवर्ती बँक हे डॉलर विकून व्यवहार पूर्ण करणार आहे. (Forex Reserve)
(हेही वाचा – Rohit Sharma Retirement Plan : रोहित शर्माच्या निवृत्तीचं ठरलं; ‘हा’ असणार शेवटचा सामना)
येणाऱ्या काही दिवसांत रुपयाची डॉलरच्या तुलनेत स्थिती सुधारेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज असावा. त्याशिवाय भारतीय गंगाजळीत सोनंही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा फायदाही रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. अर्थात, स्वॅपमुळे वाढलेली परकीय गंगाजळी ही वायदे बाजारातील असल्यामुळे आणि हा व्यवहार ठरावीक तारखेला पूर्ण करायचा असल्यामुळे ही वाढ ही तात्कालीक असेल, असंही जाणकारांनी म्हटलं आहे. (Forex Reserve)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community