-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या हंगामात राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीचा मुख्य प्रशिक्षक आहे. पण, गेल्याच आठवड्यात बंगळुरूमध्ये एक स्थानिक सामना खेळताना त्याचा डावा पाय दुखावला. तो सध्या कास्ट घालून वावरतो आहे. तर चालताना त्याला कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. पण, राजस्थान फ्रँचाईजीचं सराव शिबीर सुरू झाल्यावर त्याही अवस्थेत राहुल जयपूरला शिबिरासाठी पोहोचला आहे. विमानतळावर तसंच सरावाच्या मैदानावरही राहुल कुबड्यांमध्ये दिसला. पण, संघाचा सरावाचा गणवेश असलेल्या गुलाबी जर्सीत तो मैदानावर हजर होता. त्याची जबाबदारीची जाणीव आणि खेळाप्रती समर्पण या गुणांचं इंटरनेटवर सध्या जोरदार कौतुक होत आहे. (IPL 2025)
राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीने द्रविड सरावासाठी मैदानावर येतानाचा व्हिडिओच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर द्रविड फलंदाजीचा अख्खा सराव पाहताना दिसत आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – SIP Stoppage : म्युच्युअल फंडातील एसआयपी थांबण्याचं प्रमाण फेब्रुवारीत १२२ टक्क्यांनी वाढलं)
💗➡️🏡 pic.twitter.com/kdmckJn4bz
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 13, 2025
एकदा हा व्हिडिओ पाहिल्यावर फक्त राजस्थान फ्रँचाईजीच्या पाठीराख्यांनीच नाही तर क्रिकेट चाहत्यांनीही या फोटोला भराभर लाईक केलं आहे. तर द्रविडच्या संघाप्रती असलेल्या कटीबद्धतेचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी एका चाहत्याने, ‘प्रशिक्षकाला दुखापतग्रस्त होताना कधी पाहिलं नव्हतं,’ अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिली आहे. ५२ वर्षीय द्रविड बंगलुरूमध्ये एका क्लबस्तरीय सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. आपला मुलगा अन्वयबरोबर या सामन्यात तो फलंदाजीला उतरला होता. (IPL 2025)
(हेही वाचा – Konkan विभागामध्ये होणार 8 हजार कोटींची गुंतवणूक)
Never seen coach getting injured 😭😭😭😭❤️❤️
— _Seervi (@seerviRahul060) March 13, 2025
Anything for the team. 🙌
— Halla Bob (@kalalbob25) March 13, 2025
Sad to see 😔 RR 🩷
— Sanjay ks (@_Sanjayks) March 13, 2025
द्रविड राजस्थान फ्रँचाईजीकडूनच आयपीएल खेळला आहे. २०१४ मध्ये तो संघाचा मार्गदर्शक बनला. त्याच्या कारकीर्दीत संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग हे खेळाडू भारतीय संघापर्यंत पोहोचले. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community