रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहिल्यांदाच युक्रेनसोबतच्या युद्धविराम (Russia – Ukraine War) चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, रशिया युद्धबंदीच्या प्रस्तावांशी सहमत आहे, परंतु यामुळे दीर्घकालीन शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि युद्धाची मूळ कारणे सोडवली पाहिजेत. पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामावर चर्चा केल्याबद्दल आभार मानले. युद्धाच्या मुद्द्यावर लक्ष दिल्याबद्दल त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांचे आभार मानले. युक्रेनने अमेरिकेच्या दबावाखाली युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे, तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी स्वतः अमेरिकेकडून हा प्रस्ताव मागायला हवा होता.
युक्रेन युद्धबंदीसाठी तयार
युद्धातील युद्धबंदीबाबत सौदी अरेबियात अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत युक्रेनने 30 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली. अमेरिकेला ही योजना रशियासमोर मांडायची आहे. तथापि, रशियाने यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा इन्कार केला होता. कोणत्याही तात्पुरत्या युद्धबंदीचा (Russia – Ukraine War) फायदा युक्रेनच्या लष्करालाच होईल, असे पुतीन म्हणाले होते. यामुळे युद्धक्षेत्रात पिछाडीवर पडलेल्या युक्रेनच्या सैन्याला आपल्या सैन्याची संख्या वाढवून तयारी करण्यास मदत होणार आहे. रशियाने पाश्चात्य देशांसोबत सर्वसमावेशक सुरक्षा करार करण्याची मागणी केली आहे. यात युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही याची हमी देखील समाविष्ट आहे. डिसेंबरमध्ये पुतिन म्हणाले, “आम्हाला शांतता हवी आहे, युद्धविराम नाही. रशिया आणि तेथील नागरिक सुरक्षिततेच्या हमीसह शांततेला पात्र आहेत.
रशियाचा सर्वात मोठ्या शहरावर ताबा
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दावा केला की, त्यांच्या सैन्याने कुर्स्क भागातील सर्वात मोठे शहर सुदजावर नियंत्रण मिळवले आहे. अध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी, 12 मार्चला लष्करी गणवेशात कुर्स्कला भेट दिली, त्यादरम्यान त्यांनी या भागातून युक्रेनियन सैन्याला बाहेर काढण्याबद्दल बोलले. पुतीन बुधवारी कुर्स्क येथील रशियन लष्कराच्या कमांड पोस्टवर पोहोचले. त्यांच्यासोबत रशियाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह हेही होते. रशियाने पुतीन यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. रशियाने युक्रेनचा 20 टक्के भाग व्यापला आहे. (Russia – Ukraine War)
Join Our WhatsApp Community