सध्या उद्धव ठाकरे (Thackeray) आणि राज ठाकरे हे दोघे जण एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ठाकरें बंधुंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठाकरे बंधूंसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आता या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे (Thackeray) बंधू एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र यावे असा प्रयत्न बाळासाहेब असतानाही झाला. मात्र एका हाताने टाळी वाजत नाही. आता टाळी वाजवण्यापलीकडे गेले. आता शक्य वाटत नाही, असे शिरसाट म्हणाले.
(हेही वाचा भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक…)
महाराष्ट्राला सध्या दोघांची गरज
आज होळीचा सण आहे, त्यामुळे होळीला सर्व काही विसरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी एकत्र यावे. बंधू बंधूसाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची गरज आहे. तसेच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मराठी माणूस मराठी माणसासोबत भांडतो. दोन गटात विभाजन झाले आहे. दोन ठाकरे (Thackeray) ब्रँड वेगळे झाले आहेत. जर ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला किंवा विविध कामगार सेनेला बळ मिळेल, अशी भावना मराठी सेनेचे मोहनिश रविंद्र राऊळ यांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community