पाकिस्तानच्या (Pakistan) बलूचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणानंतर खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला झाला, या हल्ल्यात बरेच लोक मृत्युमुखी पडले, त्यानंतर शुक्रवारी, १४ मार्चला एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात मौलवीसह चार जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका मशिदीत नमाज दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला. जिल्हा पोलीस अधिकारी आसिफ बहादर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण वजिरिस्तानमधील मौलाना अब्दुल अजीज मशिदीत आयईडी स्फोट झाला. यात जमियत उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय) जिल्हा प्रमुख मौलाना अब्दुल्ला नदीम आणि इतर जखमी झाले आहेत. मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
(हेही वाचा Russia – Ukraine War : युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प आणि मोदींचे मानले आभार; कारण…)
माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना वाना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच बरोबर, पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पाकिस्तानातील (Pakistan) खैबर पख्तूनख्वामध्ये यापूर्वीही या मशिदींना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेषतः शुक्रवारच्या नमाजाच्या वेळीच या मशिदींना लक्ष्य केले जाते. कारण या दिवशी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने लोक नमाजसाठी एकत्र येतात. गेल्या महिन्यातच, या प्रांतातील दारुल उलूम हक्कानिया मदरशात आत्मघातकी स्फोट झाला होता. यात JUI-S नेते मौलाना हमीदुल हक हक्कानी यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाले होते.
Join Our WhatsApp Community