उन्हाळ्यामुळे दूध (Milk) संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. नवी दरवाढ उद्यापासून, शनिवार, १५ मार्चपासून लागू होणार आहे.
पुण्यातील कात्रज दूध (Milk) संघात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत दूध (Milk) भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची (Milk) मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली, असे संघटनेचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community