जम्मू आणि काश्मीर प्रदेशात सध्या किमान ५९ परदेशी दहशतवादी (Terrorist) सक्रिय आहेत. यापैकी ३५ दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी, २१ जैश-ए-मोहम्मद (जेईएम) शी आणि ३ हिज्बुल-मुजाहिदीन (एचएम) शी संबंधित आहेत. याशिवाय येथे १७ स्थानिक दहशतवादी (Terrorist) देखील सक्रिय आहेत. यापैकी १४ दहशतवादी श्रीनगर खोऱ्यात आणि उर्वरित ३ दहशतवादी जम्मू सेक्टरमध्ये आपल्या कारवाया करत आहेत.
अशाप्रकारे, एकूण ७६ दहशतवादी सक्रिय आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत सक्रिय दहशतवाद्यांची (Terrorist) संख्या ९१ होती. ही जवळजवळ २०% ची घट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये २५० हून अधिक दहशतवादी घटनांची नोंद झाली होती, जी २०२४ मध्ये ४० पर्यंत कमी झाली. अधिकाऱ्यांच्या मते, दहशतवाद्यांच्या(Terrorist) एकूण संख्येत घट होणे हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, परंतु परदेशी दहशतवादी अजूनही एक मोठी समस्या आहे.
Join Our WhatsApp Community