धुळवडीच्या (Rangpanchami) सणाच्या (Holi 2025 ) दिवशी महाराष्ट्रात आठ जणांचा मृत्यू (Death) झाला. ठाणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांत या घटना घडल्या आहेत. यात एका १४ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झालेले तरुण धुळवड खेलून पोहण्यासाठी गेले होते. (Holi 2025 )
हेही वाचा-Railway : ठाण्यात उभे राहणार 11 मजल्यांचे रेल्वे स्टेशन
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असलेल्या राहटोली गावाजवळ असलेल्या पोद्दार संकुल आहे. शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी तीन वाजताच्या सुमारास या संकुलातील काही तरुण रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात आले होते. त्यातील एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाला वाचवताना इतह तीन मित्रही पाण्यात बुडाले. बदलापूर अग्निशामक दलाच्याकडून कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचे मृतदेहर बाहेर काढण्यात आले. (Holi 2025 )
रंगपंचमीनंतर अंघोळीसाठी प्राणहिता नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (१४ मार्च) दुपारी २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर घडली. कामपल्ला राजकुमार (वय २०, रा. वेमनापल्ली जि. मंचेरियाल-तेलंगणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Holi 2025 )
रंग खेळून झाल्यावर नाल्यावर आंघोळीस गेलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा नाका तोंडात पाणी गेल्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. राजवीर संतोष सिंग तवर (वय 14 वर्ष, रा. मायबाई वार्ड) असे मृतक बालकाचे नाव आहे. सुजल गजानन चांदुरकर (वय 17 वर्ष, रा. मायबाई वार्ड) याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. (Holi 2025 )
हेही वाचा-Terrorist : जम्मू आणि काश्मीरमध्ये ७६ दहशतवादी सक्रिय
यवतमाळ येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणात पोहण्यासाठी आठ जण गेले होते. त्यातील पाच जण बुडत असताना त्यातील तिघांना वाचविण्यात आले, तर दोन मावस भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (१४ मार्च) धुळवड खेळून अंघोळीसाठी दुपारी धरणात उतरले असताना ही घटना घडली. पंकज अशोकराव झाडे (वय ३५, रा. झाडगाव, राळेगाव), जयंत पंढरी धानफुले (वय २८, रा. मार्डी, ता.मारेगाव) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले होते. (Holi 2025 )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community