Mumbai Mega Block: रविवारी ‘या’ दोन मार्गांवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Mumbai Mega Block: रविवारी 'या' दोन मार्गांवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

54
Mumbai Mega Block: रविवारी 'या' दोन मार्गांवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
Mumbai Mega Block: रविवारी 'या' दोन मार्गांवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

मुंबई लोकलने (Mumbai Mega Block) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उपनगरी रेल्वे (Mumbai Local) मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (16 मार्च) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील (Central Railway) ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तसेच पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकचे वेळापत्रक कसे असेल ते सविस्तर जाणून घेऊयात. (Mumbai Mega Block)

हेही वाचा-Chamar Brand : काय आहे चमार ब्रँड? आणि काय आहे याचे वैशिष्ट्य?

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात CSMT येथून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि समी जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबणार असून गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. (Mumbai Mega Block)

हेही वाचा-Sunita Williams यांच्या परतीचा मार्ग मोकळा !

तसेच, कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद-सेमी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्याही गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिराने पोहोचणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Mumbai Mega Block)

हार्बर मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक
हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पनवेल-ठाणे अप-डाऊन मार्गावरील लोकलही बंद राहणार आहेत. (Mumbai Mega Block)

हेही वाचा-राजकीय, सरकारी जाहिरातींत महिलेच्या छायाचित्रांचा वापर ; High Court मध्ये याचिका दाखल

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉकच्या काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल उपलब्ध असणार आहेत. तसेच बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान सेवा सुरू राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (Mumbai Mega Block)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.