-
ऋजुता लुकतुके
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेमका कधी तंदुरुस्त होणार आणि आयपीएलमध्ये (IPL 2025) तो खेळू शकेल की नाही, यावर अजून कुठलीही स्पष्टता नाही. निदान सुरुवातीचे सामने तरी तो सध्या खेळू शकणार नाहीए. त्यामुळे मार्चमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ड्रेसिंग रुममध्येही दिसण्याची शक्यता कमीच आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असताना बुमराहला (Jasprit Bumrah) पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. गोलंदाजीच्या अती भारामुळेच बुमराहवर ही परिस्थिती ओढवली. त्यानंतर तो चॅम्पियन्स करंडक खेळू शकलेला नाही.
JASPRIT BUMRAH IS EXPECTED TO JOIN MUMBAI INDIANS TEAM BY EARLY APRIL FOR IPL 2025..!!!! (ESPNcricinfo). pic.twitter.com/v61PECJGQD
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 14, 2025
(हेही वाचा – राजकीय, सरकारी जाहिरातींत महिलेच्या छायाचित्रांचा वापर ; High Court मध्ये याचिका दाखल)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५ कसोटींत बुमराहने (Jasprit Bumrah) ३२ बळी घेतले. पण, शेवटच्या सिडनी कसोटीत त्याच्या जुन्या पाठदुखीने उचल खाल्ली. आणि शेवटच्या डावांत तो गोलंदाजी करू शकला नाही. २०२३ मध्ये त्याच्या पाठीवर याच भागात शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे हा मामला नाजूक आहे. आणि बुमराह (Jasprit Bumrah) सध्या बंगळुरूत क्रिकेट अकादमीत या दुखापतीवर उपचार घेत आहे. पुन्हा खेळण्यासाठी त्याला अकादमीतील डॉक्टरची परवानगी लागेल. किमान मार्चमध्ये तो मुंबईच्या ताफ्यात शामील होऊ शकत नाही. आणि एप्रिलमध्ये पुन्हा एकदा त्याच्या दुखापतीचं परीक्षण करून निर्णय घेतला जाईल. (IPL 2025)
मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) पहिले दोन सामने हे २३ मार्चला चेन्नई विरुद्ध आणि २९ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) आहेत. हे दोन्ही सामने मुंबईच्या बाहेर आहेत. त्यानंतर मुंबईचा पहिला घरचा सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध आहे. तर त्यानंतरचा सामना ७ एप्रिलला बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध आहे. मध्ये ४ एप्रिलचा सामना लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध लखनौ इथं आहे. (IPL 2025)
बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) ट्रेंट बोल्ट, रिकी टॉपली आणि दीपक चहर हे आघाडीचे तेज गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्सचा तेज गोलंदाजांचा ताफा – जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, रिकी टॉपली, दीपक चाहर, कॉर्बिन बॉश, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, सत्यनारायण राजू, हार्दिक पटेल (अष्टपैलू), राज अंगद बावा (अष्टपैलू)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community