Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट

94
Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट
Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट

आयुष्मान योजनेअंतर्गत (Ayushman Yojana) मोफत उपचारांसाठी वयोमर्यादा ६० वर्षे असावी. यासोबतच, उपचारांसाठी देण्यात येणारी ५ लाख रुपयांची रक्कमही दुप्पट करून १० लाख रुपये करावी, अशी राज्यसभा खासदार राम गोपाल यादव (Ram Gopal Yadav) यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीने केंद्र सरकारला (Central Govt) याची शिफारस केली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. सध्या, फक्त ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. (Ayushman Yojana)

हेही वाचा-Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच 30 किलो गोमांस पकडले ; कठोर कारवाईची मागणी

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 11 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (ABPMJAY) चा विस्तार करून ४.५ कोटी कुटुंबांमधील ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना AB-PMJAY वय वंदना योजनेअंतर्गत समाविष्ट केले. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे, जी देशातील सर्वात गरीब ४० टक्के लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. (Ayushman Yojana)

हेही वाचा-Mumbai Mega Block: रविवारी ‘या’ दोन मार्गांवर मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

या योजनेअंतर्गत, देशभरातील निवडक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतर १० दिवसांनी झालेला खर्च देण्याची तरतूद आहे. आयुष्मान योजनेअंतर्गत जुनाट आजार देखील समाविष्ट आहेत. कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च या योजनेअंतर्गत समाविष्ट केला जातो. वाहतुकीवर होणारा खर्च यामध्ये समाविष्ट आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादींचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत, या योजनेअंतर्गत ५.५ कोटींहून अधिक लोकांनी स्वतःवर उपचार केले आहेत. (Ayushman Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.