भांग घेतात म्हणून काय बोलतात ते लक्षात राहत नाही; Kripashankar Singh यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

105
भांग घेतात म्हणून काय बोलतात ते लक्षात राहत नाही; Kripashankar Singh यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
भांग घेतात म्हणून काय बोलतात ते लक्षात राहत नाही; Kripashankar Singh यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
  • मुंबई प्रतिनिधी

राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतात, हे त्यांनाच लक्षात राहत नाही. ते मनसैनिकांना काहीतरी करायला सांगतात, पण स्वतः वेगळंच करतात. सकाळी उठल्यावर भांग घेतात, म्हणूनच त्यांचं बोलणं विसरतात, अशी घणाघाती टीका भाजपा नेते कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केली आहे.

गंगा प्रदूषणावर राज ठाकरेंच्या टीकेला कृपाशंकर सिंह यांचा प्रत्युत्तर

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गंगा नदीच्या प्रदूषणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. “राज ठाकरेंना (Raj Thackeray) काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज ते काय बोलतात आणि उद्या काय बोलणार आहेत, हे त्यांनाही माहीत नसतं. मला वाटतं, ते सकाळी उठून भांग घेतात आणि मग काहीही बरळतात,” असे सिंह म्हणाले.

“होळीच्या निमित्ताने त्यांना एक भांगेचा गोळा पाठवण्याचा विचार करत आहे,” अशी जहरी टिप्पणीही त्यांनी केली.

(हेही वाचा – IPL 2025 : जसप्रीत बुमराह आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार?)

मनसेचा संतप्त प्रतिसाद – “कानाखाली आवाज जाईल!”

कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्या या टीकेवर मनसेने तुफान पलटवार केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी सिंह यांना थेट इशारा देत म्हटले – “तुमची लायकी नाही, तरीही तुम्ही राज ठाकरे (Raj Thackeray) साहेबांवर वैयक्तिक टीका करता. जर कोणीही त्यांच्यावर अशा प्रकारची टीका केली, तर त्याच्या कानाखाली आवाज निघेल!”

यासोबतच खोपकर (Ameya Khopkar) यांनी कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांची राजकीय कारकीर्दही लक्षात आणून दिली. “आज एका पक्षात, तर उद्या दुसऱ्या पक्षात फिरणारे ते राजकारणातील फेरीवाले आहेत. त्यांचं मत गंभीरपणे घेण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

(हेही वाचा – Holi नंतर आता पर्यटकांची अयोध्या, काशी, प्रयाग तीर्थस्थळांना पहिली पसंती; विमान तिकिटांचे बुकिंग वाढले)

भाजपा-मनसे संघर्ष शिगेला

या वादामुळे भाजपा (BJP) आणि मनसे (MNS) यांच्यातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. काही ठिकाणी मनसैनिकांनी कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्या विरोधात निदर्शने केली.

राजकीय वर्तुळात खळबळ – पुढे काय?

भाजपाचे वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. तसेच, राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः यावर काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.