मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन

85
मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन
मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन
  • मुंबई प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी, १६ मार्च रोजी मालवणमध्ये (Malvan) मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आमदार राणे यांचा वाढदिवस १७ मार्चला असला तरी विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने तो १६ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम मालवणमध्ये (Malvan) मोठ्या दिमाखात पार पडणार असून, १० हजारांहून अधिक शिवसैनिक या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

(हेही वाचा – SSP Salary Per Month : पोलिस दलात एसएसपी ला किती वेतन दिलं जातं? ठाऊक आहे का तुम्हाला?)

शिंदे गटाचे ठाकरेंच्या शिवसेनेला खुले आव्हान?

या शक्तिप्रदर्शनामधून राणे बंधू आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, यानिमित्ताने शिवसेना (ठाकरे गट) आणि विरोधकांना स्पष्ट संदेश दिला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान

रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे मालवणमध्ये (Malvan) राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या शक्तिप्रदर्शनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. राणे बंधू आणि शिंदे गटाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची ही नामी संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.