-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँक (Reserve Bank) आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकूण तीन वेळा रेपो दर (Repo Rate) कपात करू शकते. आणि अलीकडेच केलेल्या २५ अंशांच्या कपातीनंतर आणखी दोनदा प्रत्येकी २५ अंशांच्या दर कपातीचा अंदाज स्टेट बँकेच्या (State Bank) वार्षिक अहवालात नोंदवण्यात आला आहे. एप्रिल २०२५ नंतर आता जून आणि ऑक्टोबरमध्येही प्रत्येकी २५ अंशांची दर कपात अपेक्षित आहे. फेब्रुवारी महिन्यात देशातील महागाई दर ३.६१ टक्क्यांवर आला आहे. त्यानंतर दर कपातीबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. आणि या अहवालातूनही तेच अधोरेखित होत आहे.
स्टेट बँकेच्या (State Bank) अहवालात महागाई दर यावर्षी ३.९० टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण, तेच जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत किरकोळ महागाई दर ४.०९ टक्के राहील असा अंदाज आहे. आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये तो पुन्हा ४.२ ते ४.४ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकतो. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२५ मध्येच तीन वेळा रेपो दरकपात (Repo Rate) होईल असा अंदाज आहे.
(हेही वाचा – Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच 30 किलो गोमांस पकडले ; कठोर कारवाईची मागणी)
‘सध्या देशाचा महागाई दर आटोक्यात आहे. आणि तो सात महिन्यांच्या नीच्चांकावर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिना आणि इथून पुढेही महागाई अशीच राहील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रेपो दरात (Repo Rate) पुढील दोन सलग पतधोरणांमध्ये मिळून ७५ अंशांची कपात होईल असा आमचा अंदाज आहे,’ असं स्टेट बँकेच्या (State Bank) अहवालात म्हटलं आहे. एसबीआय रिसर्च इकोरॅप असं या अहवालाचं नाव आहे. भाज्या (Vegetables) आणि अन्नपदार्थांच्या (food) किमती या तिमाहीत उतरल्या आहेत. तर महाकुंभामुळे देशात उपासाचं वातावरण होतं. आणि अशावेळी भाज्यांमधील महागाई दरातील वाढ गेल्या २० महिन्यांत पहिल्यांदाच शून्याच्याही खाली उणे होती. फळांची मागणी मात्र वाढली.
पण, परदेशातून आयात होणारं खाद्यतेल आणि रासायनिक पदार्थ यामुळे किमती तरीही चढ्याच होत्या. आणि रुपयाची घसरण अजून थांबलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांतही महागाईचा त्रास पूर्णपणे थांबणार नाही. ते गृहित धरूनच रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank) रणनीती ठरवावी लागेल. देशातील औद्योगिक उत्पादन दर आता हळू हळू सावरतोय. आणि जानेवारी २०२५ मध्ये तो ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही जमेची बाजू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community