अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ४१ देशांवर व्यापक प्रवास बंदी घालण्याच्या योजनेवर विचार करत आहेत. या प्रस्तावित धोरणाचा विशेषतः भारताच्या शेजारील देश जसे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांवर परिणाम होऊ शकतो. या देशांचे लोक अमेरिकेत अनधिकृतच काय तर अधिकृतरित्याही जाऊ शकत नाहीत, असा ट्रॅव्हल बॅन (travel ban) आणला जात आहे. (Donald Trump)
हेही वाचा-Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट
अमेरिकी सरकारने पाकिस्तानसह (Pakistan) ४१ देशांवर प्रवास प्रतिबंध लादण्याची तयारी केली आहे. हे प्रतिबंध जास्त कठोर असणार आहेत. यासाठी ४१ देशांची यादी बनविण्यात आली असून रेड, ऑरेंज आणि यलो अशा प्रकारात टाकण्यात आले आहे. सात मुस्लिम देशांचाही यात समावेश आहे. भारताच्या जवळच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांचाही यात समावेश आहे. (Donald Trump)
हेही वाचा-मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन
अमेरिकेचा व्हिसा आंशिक निलंबित करण्याच्या यादीत काही देशांना टाकण्यात येणार आहे. यात पाकिस्तानचाही समावेश आहे. असे २६ देश आहेत. यासाठी या देशांना त्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी ६० दिवसांत दूर करायच्या आहेत. असे केल्यास पाकिस्तानला या कारवाईपासून वाचता येणार आहे. (Donald Trump)
हेही वाचा-Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच 30 किलो गोमांस पकडले ; कठोर कारवाईची मागणी
या यादीत तुर्कमेनिस्तान, बेलारूस, भूतान आणि वानुआतु यांचा देखील समावेश आहे. रेड लिस्टमध्ये अफगाणिस्तान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन हे देश आहेत. या देशाच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले जाणार आहेत. तसेच यापुढे या देशाच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश असणार नाही. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community