एनएमआयएमएस (नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) हे भारतातील एक प्रतिष्ठित खाजगी विद्यापीठ आहे, जे उच्च शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ओळखले जाते. या संस्थेची स्थापना १९८१ मध्ये मुंबईत झाली. ही संस्था मूलतः व्यवस्थापन शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. मात्र आता इथे विविध अभ्यासक्रम प्रदान केले जातात : (NMIMS School)
इथे उच्च-स्तरीय एमबीए अभ्यासक्रम ओरदान केला जातो तसेच व्यवस्थापनही उत्तम आहे. डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रातील अभ्यासक्रम असे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रदान केले जाते. तसेच कायदा विभागात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कायदा अभ्यासक्रम प्रदान केला जाते. (NMIMS School)
(हेही वाचा – मालवणमध्ये आमदार Nilesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शक्तिप्रदर्शन)
वाणिज्य, अर्थशास्त्र आणि लिबरल आर्ट्स अशा विविध विषयांचाही समावेश केलेला आहे. डिझाइन आणि आर्किटेक्चर असे विषय तर विज्ञान, फार्मसी आणि आरोग्य असे विविधांगी विषयाचे अभ्यासक्रम शिकवले जातात. (NMIMS School)
एनएमआयएमएसचे मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, इंदूर आणि इतर अनेक शहरांमध्ये कॅम्पस आहेत, जिथे पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम प्रदान केले जातात. शैक्षणिक निष्ठा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योग कनेक्शन यामुळे ही शैक्षणिक संस्था सातत्याने भारतातील शीर्ष विद्यापीठांमध्ये स्थान मिळवत आहे. (NMIMS School)
(हेही वाचा – भांग घेतात म्हणून काय बोलतात ते लक्षात राहत नाही; Kripashankar Singh यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल)
एनएमआयएमएस (नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) ही एक बहुविद्याशाखीय विद्यापीठ आहे जिथे १७ स्कूल कार्यरत असून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, कायदा, वाणिज्य, उदारमतवादी कला, डिझाइन आणि इतर विविध क्षेत्रात अभ्यासक्रम प्रदान केले जातात. त्यामुळे शिक्षणासाठी तुम्ही जर या संस्थेचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. (NMIMS School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community