-
ऋजुता लुकतुके
महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतीय कंपनी एसयुव्ही कारच्या उत्पादनात भारतातील एक अग्रेसर कंपनी आहे. आता इलेक्ट्रिक एसयुव्ही क्षेत्रात कंपनी दमदार पावलं टाकताना दिसत आहे. खास इलेक्ट्रिक एसयुव्ही श्रेणीतील वाहनं एकामागून एक बाजारात आणण्याचा सपाटा कंपनीने लावला आहे. या वाहनांचा लुकही आकर्षक तसंच तरुणांचं लक्ष वेधणारा आहे. २०२८ पर्यंत आणखी पाच नवीन मॉडेल भारतात लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. यातीलच जून २०२५ मध्ये लाँचच्या तयारीत असलेलं एक मॉडेल आहे एक्सईव्ही ४ई. काहीजणांनी भारतीय रस्त्यांवर या गाडीची ट्रायल सुरू झाल्याचा दावाही केला आहे. त्याविषयी अजून अधिकृत माहिती कंपनीकडून आलेली नाही. पण, १३ लाख रुपयांच्या आसपास असलेली ही एसयुव्ही असेल असा अंदाज आहे. या गाडीतील इतर फिचर (Feature) हे महिंद्राच्या एक्सयुव्ही ५०० या गाडीप्रमाणे असतील. ५ सीटर ही गाडी असेल. (Mahindra XEV 4E)
३४.५ आणि ३९.५ किलोवॅट बॅटरी सेटचा पर्याय या गाडीत मिळेल असा प्राथमिक अंदाज आहे. आणि गाडीची रेंज एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर ५५० किलोमीटरपर्यंतची असेल असा अंदाज आहे. महिंद्राच्या एक्सयुव्ही ईव्ही गाडीसारखीच या गाडीचीही क्षमता असेल. (Mahindra XEV 4E)
(हेही वाचा – tata harrier ev : टाटा मोटर्सच्या टाटा हॅरियर ईव्ही या जबरदस्त कारचे फीचर्स पाहून व्हाल थक्क)
New Mahindra SUV Launches In 2025 – XEV 4e, 7e, Thar FL, Scorpio N Pickup https://t.co/VtpPS48ySC pic.twitter.com/OkVtXrrARy
— RushLane (@rushlane) December 28, 2024
जुन्या एक्सयुव्हीच्या मानाने नवीन गाडीत अंतर्गत रचनेत आणि बाहेरूनही मोठे बदल असतील. मोठी इन्फोटेनमेंट यंत्रणा, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल क्लस्टर, नवीन स्टिअरिंग व्हील, याशिवाय अघिकचे पैसे मोजून तुम्ही ३६० अंशांचा सराऊंड कॅमेरा, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर आणि एडीएएस यंत्रणा अशा आधुनिक सुविधाही तुम्हाला मिळू शकतील. (Mahindra XEV 4E)
भारतात या गाडीची स्पर्धा असेल ती टाटा निक्सॉन, किया सॉनेट, ह्युंदे व्हेन्यू, रेनॉ किगर, निस्सान मॅग्नेट, मारुती सुझुकी ब्रेझा आणि सिट्रॉन एअरक्रॉस या गाड्यांशी असेल. महत्त्वाचं म्हणजे या गाडीची किंमत १२ लाख रुपयांपासून सुरू होत १७.७५ लाखांपर्यंत असेल असा अंदाज आहे. यावर्षी जूनच्या मध्यावर ही गाडी भारतात लाँच होईल. (Mahindra XEV 4E)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community