-
ऋजुता लुकतुके
क्रिकेट प्रेमींचं लक्ष आता इंडियन प्रीमियर लीगकडे लागलं आहे. स्पर्धेचा अठरावा हंगाम येत्या २२ मार्चला सुरू होत आहे. आणि त्यासाठी आयपीएलमधील सर्व १० संघांची सराव शिबिरं सुरू झाली आहेत. चॅम्पियन्स करंडकानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूही आता आपापल्या संघांच्या ताफ्यात शामील झाले आहेत. या हंगामातील दहाही फ्रँचाईजींचे कर्णधार आता ठरले आहेत आणि यात ५ नवीन दमाच्या कर्णधारांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांनी आपापले कर्णधार आधीच जाहीर केले होते. मुंबईने गेल्या हंगामातील खराब कामगिरीनंतरही हार्दिक पांड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. तर चेन्नईने गेल्या हंगामातच धोनीकडून नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे. आता दिल्ली फ्रँचाईजीने अक्षर पटेलवर विश्वास दाखवला आहे. (IPL 2025)
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
When is your favourite team’s first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चैलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट राइडर्स नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहे. दिल्लीने अक्षर पटेलवर, लखनौने ऋषभ पंतवर, पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरवर, आरसीबीने रजत पाटीदार याच्यावर तर केकेआरने अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – Ayushman Yojana : आयुष्मान योजनेत वयोमर्यादा 60 पर्यंत वाढवणार, मदतही मिळणार दुप्पट)
- दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
- सनराइजर्स हैद्राबाद – पैट कमिंस
- रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु – रजत पाटीदार
- राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
- पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
- लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
- मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
- कोलकाता नाइट राइडर्स – अजिंक्य रहाणे
- गुजरात टायटन्स – शुभमन गिल
- चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड
(हेही वाचा – Repo Rate : २०२५ मध्ये एकूण ७५ अंशांनी रेपोदर कपातीची शक्यता)
आयपीएल २०२५ च्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावेळी आयपीएलचे सर्व सामने एकूण १३ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना २२ मार्च रोजी रात्री साडेसात वाजता सुरु होईल, तर नाणेफेक अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच ७ वाजता होईल. आरसीबीने यावेळी कर्णधारपदाची धुरा रजत पाटीदार यांच्यावर सोपवली आहे, तर केकेआरचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. (IPL 2025)
आईपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. यंदाही या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळतील. मात्र, यावेळी कोण कोण उपस्थित राहणार? याबाबतची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली नाही. सहा वाजता उद्घाटन सोहळा झाल्यानंतर पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community