मालेगावमध्ये Vote Jihad साठी ‘फंडिंग’ ; माजी आमदार आसिफ शेख यांचा गौप्यस्फोट

51
मालेगावमध्ये Vote Jihad साठी 'फंडिंग' ; माजी आमदार आसिफ शेख यांचा गौप्यस्फोट
मालेगावमध्ये Vote Jihad साठी 'फंडिंग' ; माजी आमदार आसिफ शेख यांचा गौप्यस्फोट

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी (Vote Jihad) बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आमदार आसिफ शेख (Ashif Shaikh) यांनी दि. १४ मार्च रोजी केला. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे देणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

( हेही वाचा : विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?

माजी आमदार आसिफ शेख (Ashif Shaikh) यांचा विधानसभा निवडणुकीत मालेगावचे (Malegaon) विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती (Maulana Mufti ) यांच्याकडून अवघ्या काही मतांनी पराभव केला. त्यातच आसिफ शेख (Ashif Shaikh) यांनी मालेगावात व्होट जिहाद (Vote Jihad) झाल्याचे मान्य केला आहे. त्यामुळे विरोधकांचा कुटील डाव उघडा पडू लागला आहे, असा दावा माजी आमदार शेख यांनी केला.

विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी बाहेरून पैसा आला!

दरम्यान माजी आमदार आसिफ शेख (Ashif Shaikh) लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे. माझ्याकडे ‘व्होट जिहाद’संदर्भात (Vote Jihad) असलेले पुरावे त्यांना सादर करणार आहे. मालेगावात (Malegaon) निवडणुकीसाठी बाहेरून पैसा आला होता. तसेच बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी होता, असा दावाही माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. (Vote Jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.