IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण?

59
IPL 2025 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण?
  • ऋजुता लुकतुके

गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवलं आणि ही गोष्ट चाहत्यांना अजिबात न रुचल्यामुळे मैदानावर हार्दिकची हूर्यो झालीच. शिवाय संघाच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम झाला. संघ अख्ख्या लीगमध्ये फक्त एक सामना जिंकू शकला. आता ही गोष्ट विसरून संघ नव्याने सुरुवातीची तयारी करत आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावरच नेतृत्वासाठी विश्वास दाखवला आहे. मधल्या काळात संघातील एक महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाला आहे. पण, आयपीएलमध्ये हार्दिकच संघाचं नेतृत्व करणार आहे. संघाचा पहिला सामना २३ मार्चला चेन्नईत होणार आहे आणि या सामन्यात मात्र हार्दिकऐवजी मुंबई इंडियन्सना नवीन कर्णधार शोधावा लागणार आहे. (IPL 2025)

आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर हार्दिक पांड्यावर वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. हा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नसल्याने आयपीएल २०२५ च्या हंगामापर्यंत बंदी कायम राहील. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या चेन्नईविरुद्ध संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिकला आयपीएल २०२४ मध्ये तीनदा संघाने षटकांची गती न राखल्याचा फटका बसला आहे. एकच संघ हंगामात तीनदा निर्धारित वेळेत षटकं पूर्ण करू शकत नाही, तेव्हा कर्णधारावर एका सामन्यासाठी बंदी आणली जाते. आता २०२५ चा पहिला सामना हार्दिक खेळू शकणार नाहीए आणि या सामन्यात सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतील. जसप्रीत बुमराह यालाही दुखापतीमुळे हा सामना खेळणार नाहीए. (IPL 2025)

(हेही वाचा – विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?)

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मीन्झ, रायन रिकिलटन, कृष्णन श्रीजित, बेवोन जेकॉब्स, हार्दिक पांड्या, दीपक चहर, राज बावा, विल जॅक्स, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, अश्वानी कुमार, अल्लाह गुझनफर, रीस टोपली, सत्यनारायण राजू, अर्जून तेंडुलकर, लिझार्ड विलियम्स (IPL 2025)

लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने १८ कोटी रुपये मोजले. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.