Central Bank ला भीषण आग; सगळी रोकड जाळून खाक

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला (Central Bank) दुपारच्या सुमारास ही आग लागली.

411

राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळखली जात असलेल्या सेंट्रल बँकेच्या (Central Bank) चांदुर रेल्वे शाखा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत संपूर्ण बँक जळून खाक झाली. त्या आगीत बँकेमध्ये असलेली रोकडही जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा विधानपरिषद निवडणुकीसाठी BJP मध्ये हालचालींना वेग; मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी?)

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला (Central Bank) दुपारच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. बँकेचे कामकाज सुरु असतानाचा आग लागल्याने पळापळ उडाली. आग लागल्याचे समजताच बँकेचे (Central Bank) कर्मचारी जीव वाचविण्यासाठी बाहेर आले. यात जीवितहानी झाली नाही, पण वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू, आग विझत नसल्याने धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलवण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.