Jayant Patil शरद पवारांची साथ सोडणार?

73
Jayant Patil शरद पवारांची साथ सोडणार?
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असून ते भाजपामध्ये जाणार की अजित पवार यांच्या पक्षात यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘माझं काही खरं नाही’

काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ‘माझं काही खरं नाही,’ असं जाहीर विधान करून संशयाला वाव दिला. शनिवारी, १५ मार्च २०२५ या दिवशी पाटील यांनी सांगलीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील वाटचालीबाबत पाटील निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा – Central Bank ला भीषण आग; सगळी रोकड जाळून खाक)

मोठा सेट-बॅक

राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर केवळ १० आमदारांच्या पक्षाचा नेता म्हणून जयंत पाटील यांना पुढील पाच वर्षे काढावी लागणार असल्याने पाटील (Jayant Patil) यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी हा मोठा सेट-बॅक ठरू शकतो. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी एक तर सत्तेत राहणे आवश्यक असते किंवा किमान मोठ्या पक्षात मोठ्या पदावर काम करणे गरजेचे असते. अन्यथा मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खंडन करणार की सोडणार?

जयंत पाटील (Jayant Patil) पक्ष सोडणार अशा चर्चा नेहमीच होत असतात, त्याचे खंडनही पाटील करतात. पक्ष सोडणार नाही, असे त्यांनी अनेकदा सांगितले असल्याने आज कार्यकर्ता मेळाव्यात पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.