Mumbai Indians दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन ! दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

51
Mumbai Indians दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन ! दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
Mumbai Indians दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन ! दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दुसऱ्यांदा WPL (WPL) चे जेतेपद पटकावले आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर ८ धावांनी थरारक विजय मिळवला. मुंबईच्या संपूर्ण संघाने उत्कृष्ट खेळी करत संघाच्या विजयात आपले योगदान दिले. (Mumbai Indians)

दिल्लीच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत येऊन विजयापासून दूर राहिला आहे. दिल्लीच्या पदरी सलग तिसऱ्यांदा निराशा पडली आहे. मुंबई इंडियन्स संघ WPL मध्ये दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला. दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (Mumbai Indians)

मुंबईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि निर्धारित २० षटकांत १४९ धावा केल्या. पण अंतिम फेरीत मुंबई संघाची सुरूवात फारच खराब झाली. मुंबईने पहिल्या २ षटकांत फक्त ५ धावा केल्या. तर १४ धावांवर हिली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटियाच्या विकेट्स गमावल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी ६२ चेंडूत ८९ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. (Mumbai Indians)

हेही वाचा-State Kho Kho Championship 2025 : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार

मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ विकेट्स गमावत १४१ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. मेग लॅनिंग १३ धावा करत नतालीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. तर शफाली वर्मा ४ धावा करत बाद झाली. जेस जोनासन १३ धावा करत बाद झाली. यानंतर जेमिमा रोड्रीग्जने ३० धावा करत संघाचा डाव सावरला. (Mumbai Indians)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.