
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप (BJP) सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज (16 मार्च) विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी (Sandip Joshi), संजय केनेकर (Sanjay Kenekar) आणि दादाराव केचे (Dadarao Keche) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. (Vidhan Parishad Election 2025)
महायुती सरकारमध्ये या पाचपैकी तीन जागा भाजपाला तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. (Vidhan Parishad Election 2025)
संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. (Vidhan Parishad Election 2025)
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने महाराष्ट्र में होने वाले विधान परिषद् के उप-चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/YRKcanbI6I
— BJP (@BJP4India) March 16, 2025
माधव भांडारी यांच्यावर पुन्हा अन्याय?
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता अंतिम यादीत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे. माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. 2014 साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नव्हते. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आतादेखील तेच घडले आहे. (Vidhan Parishad Election 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community