Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !

Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !

35
Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !
Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !

पुणे (Pune) विभागातील एसटीच्या ताफ्यात अधीच बसची संख्या कमी आहे, त्यातच नवीन बस येण्यास उशीर होतोय. असे असताना एसटीच्या ताफ्यातील आणखीन ७२ बस (Bus) स्क्रॅप होणार असल्यामुळे बसची संख्या आणखी कमी होणार आहे. परिणामी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या वाढत्या गर्दीत बसचे नियोजन करताना एसटी प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. (Pune)

हेही वाचा-स्फोटाने Pakistan हादरलं ! BLAच्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक ठार

राज्य शासनाच्या २०२३ च्या बस स्क्रॅप पॅालीसीनुसार १५ वर्षे जुन्या बस स्क्रॅप करण्यात येतात. त्यानुसार पुणे विभागातील एसटीच्या ताफ्यातील ७२ बस येत्या २१ मार्च रोजी स्क्रॅप करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटीच्या ताफ्यात जवळपास आठशे बस आहेत. त्यामध्ये दहा ते पंधरा बस कामानिमित्त सर्व्हिस सेंटरमध्ये आहेत. अन्य बसच्या माध्यमातून एसटीकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सेवा दिली जात आहे. (Pune)

हेही वाचा-US attack on Yemen: येमेनमधील हुती बंडखोरांवर अमेरिकेचा एअर स्ट्राइक ; २० जणांचा मृत्यू

मात्र, ताफ्यात आहेत त्या बसची संख्या कमी असल्यामुळे काही मार्गावर प्रवाशांना बस वेळेत न मिळणे, गर्दीत प्रवास करावा लागणे असे प्रकार घडत आहेत. आता पंधरा दिवसात शाळांना उन्हाळी सुट्टया लागतील. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या स्थानकात गर्दी होते. मात्र, ताफ्यातील ७२ बस स्क्रॅप होणार असल्याने कमी बसेसमध्ये एसटीची तारांबळ होणे अपरिहार्य दिसत असून, त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. (Pune)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.