भाजपा नेत्याचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, मेंदूचे…

176

Sanjay Raut : “संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, डोक्यात भुसा भरला आहे. त्यांना सत्तेची भूक आहे” असं म्हणत शिवसेना उबाठाच्या (Shivsena UBT) संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच “अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत? याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं” असं विधान भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवत केला आहे. (Sanjay Raut)

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग (State Cultural Affairs Department), सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईच्यावतीने  आयोजित ‘श्रमिकांच्या कलांचा महोत्सव’ या दोन दिवसीय विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे येथे आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेला योगदान देणाऱ्या श्रमिक कलावंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी असं म्हटलं आहे.

(हेही वाचा – स्फोटाने Pakistan हादरलं ! BLAच्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक ठार)

‘श्रमिकांच्या कलांचा महोत्सव’ या दोन दिवसीय विशेष सांस्कृतिक महोत्सवात (cultural festival) आशिष शेलार  म्हणाले की, “संजय राऊतांच्या (Sanjay Raut) मेंदूचे दोन भाग झाले आहेत. त्यांना सत्तेची भूक आहे. दोन तुकडे जरूर आहेत… भाजपा, एनडीए, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. दोन भाग एवढेच आहेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय… जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यासोबत आम्ही आहोत.” असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे.

(हेही वाचा – भाजपा नेत्याचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, मेंदूचे…)

“संधी हुकणारा कार्यकर्ता हा कमजोर नाही, आम्ही त्याला कमी लेखत नाही. तो तार्‍यावर गेलाय, चंद्रावरती गेलाय असं तो मानत नाही… ज्या तीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली ते उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत” असं शेलार यांनी म्हटलं आहे. “अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं.  सर्वांच्या भावना ज्या आहेत त्याच आमच्या भावना आहे. राऊतांच्या डोक्यात भुसा भरला आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही महत्व नाही” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.