Mumbai Airport वर कस्टम विभागाची कारवाई ३.६७ कोटी रुपयांचे सोने केले जप्त, चौघांना अटक

347

Mumbai Airport: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) कस्टम विभागाने (Customs Department) वेगवेगळ्या कारवाईत ३.६७ कोटी रुपयांचे सोने जप्त केले (3.67 crore  Gold seized) असून, यामध्ये एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आले आहे. अशी माहीती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.  (Mumbai Airport)

(हेही वाचा – नयाजने प्रेमजाळ्यात अडकवून साथीदारांसह केली स्वातीची हत्या; Karnataka मध्ये लव्ह जिहाद नेटवर्कची चर्चा)

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिघेही आरोपी विमानतळावरील (Mumbai Airport Customs Department) वेगवेगळ्या दुकानात काम करत होते आणि ते तस्करी करणाऱ्या रॅकेटमधील सदस्यांना परिसरातून सोने तस्करी (Gold smuggling) करण्यास मदत करत कारायचे. तसेच, गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ही जप्ती करण्यात आली. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर काम करणाऱ्या प्रदीप पवार या व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. अशी माहीती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

कस्टम विभागाने पवार याची झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याच्या धुळीचे पाउच जप्त (gold dust Pouches seized) केले. त्याने ते पाउच त्याच्या पँटमध्ये लपवले होते. चौकशीत त्याने सांगितले की, त्याला बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून हे सामान मिळाले होते. तर दुसऱ्या वेळी पवार यांनी असेही सांगितले की, त्यांना हे सोने दुसऱ्या आरोपी मोहम्मद इम्रान नागोरीकडून मिळाले आहे.

(हेही वाचा – Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !

तसेच पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नंतर पकडलेल्या नागोरीने अंशु गुप्ता हिचे नाव सांगितले. तिला बाहेरील प्रवाशांनी तस्करी करून आणलेल्या सोन्याच्या धुळीच्या चार पाउच दिले. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या सर्व आरोपींना तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात कमिशन मिळत होते. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावरील एका हॉटेलच्या विक्री प्रतिनिधीला या प्रकरणात अटक केलं आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.